(फोटो सौजन्य – X)
आजकाल कधी कुणाचं काय होईल ते सांगत येत नाहीत. मागील काही काळापासून अकस्मात मृत्यूंचे प्रमाण फार वाढले आहे. सोशल मीडियावरही याचा अनेक घटना व्हायरल होत असतात. आताही इथे अशीच एक घटना व्हायरल झाली आहे, ज्यात क्रिकेट मैदानात २१ वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडून आली आहे. या घटनेने सर्वत्र धुमाकूळ घातला असून याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर शेअर झाला आहे जो वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओत मुलाच्या मृत्यूचा लाइव्ह थरार दिसून आला. नक्की काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया.
व्हिडिओत काय घडले?
व्हिडिओमध्ये एक मुलगा क्रिकेट मैदानावर मित्रांसोबत क्रिकेट खेळताना दिसून येत आहे. मात्र तितक्यात अवघ्या काही सेकंदातच अचानक तो जमिनीवर पडतो, ज्यांनंतर सर्वत्र एकाच धुमाकूळ माजतो. आजूबाजूची लोक घाबरतात आणि मुलाच्या दिशेने धाव घेतात. मुलगा उठत नसल्याकारणाने त्याला रुग्णालयात दाखल केले जाते आणि तिथेच त्याला मृत घोषित केले जाते. या हृदयद्रावक घटनेचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हृदयविकाराच्या झटक्याने मुलाचा जीव गेल्याचे सांगण्यात येत आहे. प्रवासात असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना नाही. असे अनेक व्हिडिओ यापूर्वीही समोर आले आहेत. पण जेव्हा जेव्हा असे दृश्य आपल्यासमोर येते तेव्हा आपले हृदय धडधडू लागते. आजही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसला.
क्रिकेट खेलते हुए आया हार्ट अटैक, हुई मौत
हैदराबाद के एक इंजीनियरिंग कॉलेज में क्रिकेट खेलते हुए स्टूडेंट की हार्ट अटैक से मौत, CCTV में कैद हुई घटना#Hyderabad | #CCTVVideo | #ViralVideo pic.twitter.com/XauR8hKr2I
— NDTV India (@ndtvindia) April 5, 2025
महिलेने रचला इतिहास! डुकराच्या किडनीने मिळाले जीवनदान, मग अचानक जे घडलं… डॉक्टरांनाही बसला धक्का
ही घटना तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये घडून आली आहे. शनिवारी, २१ वर्षीय बी.टेकचा विद्यार्थी विनय कुमार याचे क्रिकेट खेळत असताना अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मेडचल येथील सीएमआर इंजीनियरिंग कॉलेजमध्ये क्रिकेट स्पर्धेदरम्यान ही घटना घडल्याचे वृत्त आहे. मृत विद्यार्थी विनय कुमार हा खम्मम जिल्ह्यातील रहिवासी होता. क्षेत्ररक्षण करताना अचानक खाली पडला. क्रिकेट खेळत असताना विद्यार्थ्याला हृदयविकाराचा झटका आल्याचा व्हिडिओ तिथे बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला आणि आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की विनय जमिनीवर कोणालातरी इशारा करत होता आणि काही क्षणातच तो जमिनीवर पडला. घटनेनंतर विनयला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.