'अमेरिकेतील आग गाझावरील हल्ल्यांची शिक्षा'; काय आहे टेलर स्विफ्टच्या वक्तव्या मागील सत्य? Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
अमेरिकेत लॉस एंजेलिसच्या जगलांत काही दिवसांपूर्वी भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीमुळे गेल्या आठवड्याभरामध्ये 24 जणाचा बळी गेला. शेकडो घरे, इमारतीच्या इमारती उद्धवस्त झाल्या. या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अमेरिकन प्रशासन शर्थिचे प्रयत्न करत आहे. यामुळे अनेक लोक बेपत्ता झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्याता वर्वतण्यात आली आहे. याचदरम्यान टेलर स्विफ्टचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या व्हिडिओत प्रसिद्ध गायिका टेलर स्विफ्ट ने दावा केला आहे की, लॉस एंजलिसमधील आणि कालिफोर्नियातील ही घटना देवाने दिलेली शिक्षा आहे. तसेच गाझामधील इस्त्रायलच्या नरसंहाराचा आणि अमेरिकन मदतीचा परिणाम ही आग असल्याचे टेलर स्विफ्टने म्हटले आहे. टेलर स्विप्टने असे खळबळजनक विधान का केलं यामागचे नेमकं सत्य काय आहे. हे आपण जाऊन घेणार आहोत.
व्हायरल होत असलेला खालील टेलर स्विफ्टचा व्हिडिओ एक्स युजर अहमद हुसेन याने दाव्यासह शेअर केला आहे. हा व्हिडिओ 13 जानेवारी रोजी शेअर करण्यात आला असून प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. तसेच अनेक युजर्सने देखील हा व्हिडिओ शेअर केला असून आता टेलर स्विफ्टने देखील म्हटले आहे की, गाझातील इस्त्रायल नरसंहार आणि अमेरिकेची मदतीची शिक्षा लॉस एजंसलिस ला मिळाली आहे. ही शिक्षा देवाने दिली आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
अब तो गैर मुस्लिम भी अलल ऐलान कह रही है के लॉस एंजेलिस और कैलिफोर्निया की आग दर असल खुदा का अजाब और खुदा का इंतेकाम है
ये अमेरिकी खातुन इस आग को गाजा पर जालिम इजरायल का नरसंहार और अमेरिकी माली इमदाद का नतीजा समझती है… #GazaGenocide pic.twitter.com/rmBj8aUikc
— ℍ𝕦𝕤𝕒𝕚𝕟 𝔸𝕙𝕞𝕒𝕕 (حسین )🇮🇳🇸🇦 (@ImHusainAhmad) January 13, 2025
मात्र, या व्हिडिओचा तपास करण्यात आल्यावर उघड झाले आहे की, या व्हिडिओतील ऑडिओ फाईल आणि खऱ्या व्हिडिओची ऑडिओ फाइल वेगळी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 41 सेकंदाची क्लिप व्हॉइस क्लोनिंग टेक्निकचा वापर करुन बनवली गेली असून व्हायरल व्हिडिओला जोडण्यात आली आहे. मात्र, रिव्हर्स इमेजच्या माध्यमातून खरा व्हिडिओ सापडला. यामध्ये टेलर स्विफ्टने तिच्या संघर्षाबद्दल बोलले आहे. हा व्हिडिओ 4 मिनिटं 10 सेकंदाचा आहे. तर व्हायरल व्हिडिओतील दावा हा साफ खोटा असून बनावट तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार करण्यात आला आहे. खरा व्हिडिओ तीन वर्षापूर्वीचा आहे.
योग्य व्हिडिओ
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.