हर हर महादेव! शिवलिंगाला मिठी मारलेल्या अस्वलाचा VIDEO व्हायरल; दृश्य पाहून नेटकरी आवाक् (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. कधी मजेशीर तर चित्र-विचित्र असे व्हिडिओ आपण पाहतो. डान्स, स्टंट, जुगाड, भांडण तसेच खाण्याचे व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. याशिवाय प्राण्याशी संबंधित व्हिडिओ देखील पाहायला मिळतात. सध्या असाच एक अनोखा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांना हा व्हिडिओ पाहून आश्चर्य वाटले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ छत्तीसगढमधील आहे. यामध्ये एक अस्वल एक मंदिरात शिवलिंगला मिठी मारुन बसलेले आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी “हर-हर महादेव” चा जयघोष केला आहे. हे अनोखे दृश्य छत्तीसगडच्या बागबहरा स्थित चंडी माता मंदिरातील असल्याचे म्हटले आहे. हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा हृदयस्पर्शी व्हिडिओ पाहून अनेकांनी अस्वल शंकर भगवानाचे भक्त असणार असे म्हटले आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, अस्वल शिवलिंगच्या चारही बाजूंनी बाहेर बाहेर घालून बसलेले आहे. अस्वल हळूच आपला डोके शिवलिंगवर ठेवताना दिसत आहे. अस्वलाच्या या कृत्याला पाहून अनेक लोकांनी त्याला भगवान शिवाच्या प्रति श्रद्धा व्यक्त करत असल्याचे म्हटले आहे. व्हिडिओची शूटिंग छत्तीसगडच्या बागबहरा स्थित चंडी माता मंदिरात करण्यात आली आहे. शिवलिंग हा मध्य प्रदेशाच्या उज्जैन येथील महाकालेश्वर ज्योतिर्लिंगासारखा दिसत असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
हे दृश्य इतकं आश्चर्यचकित करणं आहे की, अनेक लोकांना सुरुवातीला हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सने तयार केले असल्याचे म्हटले आहे. पण काहींनी हा व्हिडिओ खरा असल्याचे म्हटले आहे. या व्हिडिओला “creative_cherry8” या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आले आहे आणि त्याला आतापर्यंत 20 लाख लोकांनी पाहिलं आहे. व्हिडिओ पाहून लोकांनी सोशल मिडियावर “हर-हर महादेव” म्हटले आहे. अस्वलाची भक्तीला स्वीकारताना कृतज्ञता व्यक्त केली आहे. अस्वलाच्या या कृत्यामुळे अनेकांनी धार्मिक भावना व्यक्त करत, निसर्ग आणि देवतेच्या एकतेची भावना व्यक्त केली आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.