(फोटो सौजन्य: Instagram)
सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे नेहमीच अनेक घटना व्हायरल होत असतात. इथे तुम्हाला धक्कादायक, रोमांचक आणि हास्यास्पद अशा अनेक प्रकारचे व्हिडिओज पाहायला मिळू शकतात. दरम्यान आता मात्र इथे काही चिमुकल्यांचा एक नवीन पराक्रम व्हायरल झाला आहे ज्याने सर्वांनाच थक्क करून सोडले आहे. यात मुलांनी फेवीकॉलचा काही अशाप्रकारे वापर केला की पाहणारे सर्व हादरवूनच गेले. व्हिडिओत आपण पाहिले तर यात मुलाने फेवीकॉलच्या मदतीने आपले नाक ओठांना चिपकवल्याचे दिसून आले आहे. आता यानंतर काय घडलं असेल याचा विचार करा…
तरुणाचा अजब जुगाड! CONDOM पासून बनवला ऑक्सिजन सिलेंडर ; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले..
काय घडलं व्हिडिओत?
‘दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है’ हा डायलॉग तर तुम्ही अनेकदा ऐकलं असेल याचेच जिवंत उदाहरण तुम्हाला या व्हिडिओत दिसून येणार आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात काही मुलं काहीतरी खुरापती करण्याच्या विचारात असल्याचे दिसते आणि पुढच्याच क्षणी असे काही घडते की पाहून सर्वच थक्क होतात. व्हिडिओमध्ये एक मुलगा आपल्या मित्राच्या नाकावर फेवीकॉल टाकताना दिसून येतो. मित्रही यासाठी तयार असतो हसत हसत त्यांचा हा पराक्रम सुरु असतो. नाकावर फेवीकॉल टाकताच तो त्याचे ओठ नाकाला चिपवतो ज्यानंतर सर्वच त्याला पाहून हसू लागतात.
यांनंतर तो मुलगा जेव्हा आपले ओठ नाकापासून वेगळे करायला जातो तेव्हा ते जबरदस्त चिपकलेले असतात आणि काही केल्या ते नाकापासून वेगळे होत नाही. अशात मुलगा घाबरतो आणि रडायला सुरुवात करतो तितक्यात त्याचा मित्र त्याचे ओठ जोरात खेचतो ज्यामुळे कसेबसे त्याचे ओठ नाकापासून वेगळे होते. दरम्यान मुलांचा हा पराक्रम आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. काहींनी व्हिडिओवर संताप व्यक्त केला आहे तर काहींनी व्हिडिओवर मजेदार प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
Mouse VS Snake : उंदीर मामाची दहशत पहा… थेट नागाच्या फणावरच जाऊन बसला अन् मग जे घडलं… Video Viral
हा व्हायरल व्हिडिओ @hans__raj__1 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अरे भाऊ, त्याचा चेहरा खराब होऊ शकला असता” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “टेक्नॉलॉजीया” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “असे व्हिडिओ बनवणे बंद करा.. जर चुकून गोंद डोळ्यात पडला तर तो आंधळा होईल.. म्हणून अशा फालतू गोष्टी करण्यापूर्वी विचार करा”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही