(फोटो सौजन्य: X)
सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हायरल होत असतं. हे व्हिडिओ कधी आपल्याला थक्क करतात तर कधी आश्चर्याचा धक्का देऊन जातात. इथे बऱ्याचदा प्राण्यांचे व्हिडिओज देखील शेअर केले जातात जे नेहमीच लोकांच्या मनोरंजनाचे काम करतात. असाच एक अनोखा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल झाला आहे ज्यात उंदीरमामांनी असं काही करून दाखवलं की पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. विषारी नाग ज्याला जंगलाचा राजादेखील घाबरतो त्याच्या फणावरच नाग जाऊन बसला. हे दृश्य इतकं अनोखं होतं की पाहून सर्वांचेच डोळे विस्फारले. चला व्हिडिओत काय घडलं ते जाणून घेऊया.
तरुणाचा अजब जुगाड! CONDOM पासून बनवला ऑक्सिजन सिलेंडर ; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले..
व्हिडिओत काय दिसलं?
व्हायरल व्हिडिओ हा अनेकांना थक्क करणारा आहे कारण यात उंदराने सापाशी पंगा घेतल्याचे दिसून आले. साप हा जंगलातील एक विषारी प्राणी आहे, हा शिकारी प्राण्यांसाठीच नाही तर माणसांसाठीही फार धोकादायक ठरतो. याच्या विषाने कुणाचाही क्षणार्धात मृत्यू होऊ शकतो अशात जंगलातील सर्वच प्राणी त्याला घाबरून असतात. अशात चिमुकल्या उंदराची सापासोबतची ही नवीन करामत आता सर्वांनाच हादरवून सोडत आहे. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता यात एक उंदीर सापाच्या फणावर निवांत बसल्याचे दिसून येते. सापाच्या तावडीत एक उंदीर सापडला होता मात्र उंदराने काही क्षणातच असा गेम बदलला की सापही हक्काबक्का झाला. थेट फणावर हा चिमुकला प्राणी जाऊन बसल्यामुळे सापाला काही करताच आले नाही आणि हे दृश्य पाहणे आणखीनच मजेदार ठरले. दरम्यान उंदराच्या चपळाईचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
हा व्हायरल व्हिडिओ @Shikhar_India नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “उंदीर चांगलाच चपळ निघाला” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “सापाचा सध्या श्रावण सुरु आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “चपळ उंदीर”.
मगरीवर तुटून पडला बिबट्या; जबड्यात धरलं, फरपटत नेलं अन्…, थरारक VIDEO VIRAL
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही