(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
अभिनेता Vijay Deverakonda आणि अभिनेत्री Rashmika Mandanna यांच्या रिसेप्शनची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. या सोहळ्यात अनेक सेलिब्रिटींची उपस्थिती होती, पण विशेष लक्ष वेधून घेतलं ते रश्मिकाच्या आईने – Suman Mandanna यांनी. त्यांनी परिधान केलेल्या पारंपरिक कुर्ग स्टाईल साडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
भारतात प्रत्येक राज्याची साडी नेसण्याची पद्धत वेगवेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यापैकी कर्नाटकातील कुर्ग (कोडगू) भागातील महिलांची कुर्गी साडी नेसण्याची पद्धत खास आणि आकर्षक मानली जाते. पारंपरिक आणि वेगळ्या स्टाईलमुळे ही साडी नेसण्याची पद्धत अनेकांना आवडते.
या साडीची नेसण्याची पद्धत इतर साड्यांपेक्षा वेगळी आहे. कुर्ग (कोडगू) भागातील महिलांची ही पारंपरिक स्टाईल मानली जाते. सामान्यतः साडीच्या निर्या पुढच्या बाजूला खोचल्या जातात, मात्र कुर्ग पद्धतीत निर्या मागच्या बाजूला खोचल्या जातात. तसेच साडीचा पदर डाव्या खांद्यावरून न ठेवता मागून फिरवून उजव्या खांद्यावर पिनने लावला जातो.
या पद्धतीमुळे साडीला एक खास आणि पारंपरिक लूक मिळतो. कुर्ग भागातील महिला सण, समारंभ आणि खास प्रसंगी ही साडी अशाच पद्धतीने नेसताना दिसतात. त्यामुळे आजही कुर्गी साडीची ही स्टाईल भारतीय पारंपरिक वेशभूषेतील एक खास ओळख मानली जाते
Bigg Boss Marathi 6: ‘बिग बॉस’ मराठीच्या घरात ‘जुली-खुली मंजुलिका’ ची टक्कर; नव्या Promo ने वाढला TRP
कुर्ग स्टाईल साडीचा इतिहास
या पद्धतीमागेही एक खास इतिहास आहे. कर्नाटकातील कोडगू प्रदेशात पूर्वी महिला डोंगराळ भागात शेती आणि इतर कामे करत असत. त्यामुळे साडी काम करताना अडथळा येऊ नये म्हणून ही खास नेसण्याची पद्धत विकसित झाली. पदर मागून पुढे आणल्यामुळे साडी व्यवस्थित राहते आणि काम करताना सोयीची ठरते.
आजही कुर्ग समाजातील महिला लग्न, सण आणि पारंपरिक समारंभात ही साडी अशाच पद्धतीने नेसतात. त्यामुळे रश्मिकाच्या आईने रिसेप्शनमध्ये परिधान केलेल्या या साडीने केवळ फॅशनच नाही तर कुर्ग संस्कृतीची झलकही पाहायला मिळाली.






