( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
इराणकडे अण्वस्त्रे किंवा मिसाइल्स आहेतच, पण अमेरिकेसाठी इराणची नौदल शक्ती हा सर्वात मोठा धोका आहे. याचे मुख्य कारण म्हणजे ‘होर्मुजची सामुद्रधुनी’ . हा समुद्रमार्ग इराण आणि युनायटेड अरब अमिरात यांच्यामध्ये आहे. जगातील एकूण नैसर्गिक वायूच्या Natural Gas पुरवठ्यापैकी पाचवा हिस्सा याच मार्गावरून जातो. इराणने अनेकदा हा मार्ग बंद करण्याची धमकी दिली आहे. आणि जर हा मार्ग बंद झाला, तर संपूर्ण जगाचा पुरवठा विस्कळीत होईल. आणि त्याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेसह प्रत्येक घटकावर होईल.
U.S. forces aren’t holding back on the mission to sink the entire Iranian Navy. Today, an Iranian drone carrier, roughly the size of a WWII aircraft carrier, was struck and is now on fire. pic.twitter.com/WyA4fniZck — U.S. Central Command (@CENTCOM) March 6, 2026
अमेरिकेच्या ‘सेंट्रल कमांड’नुसार, आतापर्यंत अमेरिकन सैन्याने इराणची ३० हून अधिक युद्धनौके आणि जहाजे उद्ध्वस्त केली आहेत. यात एक अत्यंत गंभीर घटना म्हणजे, श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ भारताच्या सीमेजवळच अमेरिकेने एका पाणबुडीद्वारे टॉर्पेडो हल्ला करून इराणची एक युद्धनौका बुडवली.
१९७९ च्या इस्लामिक क्रांतीनंतर इराणने आपली समुद्री शक्ती दोन भागांत विभागली आहे:
पारंपारिक नौदल ज्याला Regular Navy असंही म्हणतात आणि दुसरं म्हणजे रिव्होल्युशनरी गार्ड्स म्हणजेच IRGC Navy. पारंपारिक नौदल हे मोठे जहाज आणि पाणबुड्यांच्या साहाय्याने खोल समुद्रात काम करतं. तर रिव्होल्युशनरी गार्ड्स हे नौदल प्रामुख्याने आखाती देशांत आणि इराणच्या किनारपट्टीवर सक्रिय असते. हे छोटे, अतिशय वेगवान जहाज वापरून ‘छापामार’ म्हणजेच युद्ध Guerrilla Warfare करण्यात पारंगत आहे.
ड्रोन कॅरिअर: इराणने ‘शाहिद बाघेरी’ नावाचे ड्रोन कॅरिअर बनवले होते, ज्यावरून ‘शाहेद’ सीरिजचे ड्रोन लाँच करता येत होते. अमेरिकेने युद्धाच्या सुरुवातीच्या काही तासांतच हे जहाज बुडवले. IRIS Makran हे एक विशाल जहाज असून समुद्रात चालत्या-फिरत्या मिलिटरी बेससारखे काम करते. ज्यावर हेलिकॉप्टर आणि स्पेशल फोर्सेस तैनात असतात.
इराणकडे सुमारे 25 पाणबुड्या आहेत, ज्यात रशियन बनावटीच्या ‘किलो-क्लास’ आणि स्वदेशी ‘घादिर’ व ‘नाहंग’ क्लासच्या छोट्या पाणबुड्यांचा समावेश आहे. या पाणबुड्या उथळ पाण्यात लपून हल्ला करण्यासाठी वापरण्यात येतात. IRGC चे नौदल समुद्रात सुरुंग बिछवण्यामध्ये पटाईत आहे, ज्यामुळे सागरी वाहतूक पूर्णपणे ठप्प होऊ शकते.
अमेरिकन नौदलाच्या मूल्यांकन अहवालानुसार, आयआरजीसीचे नौदल त्यांच्या हद्दीत सुरुंग टाकण्याच्या रणनीतींमध्ये माहिर आहे. शिवाय, इराणी नौदलाने पाणबुड्या आणि लहान बोटींसह अशा जहाजे मिळवली आहेत जी सुरुंग टाकण्यास आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतून शिपिंग वाहतूक विस्कळीत करण्यास सक्षम आहेत. डिफेंस इंटेलिजेंस फर्म ‘जेन्स’च्या माहितीनुसार, इराणच्या नौदलात 8 फ्रिगेट, 3 सबमरीन आणि 2 कॉर्वेट्ससह शेकडो लहान वेगवान बोटी आहेत. इराणचा हा ‘गुरिल्ला नेव्ही’चा ताफा अमेरिकेसाठी डोकेदुखी ठरत होता, म्हणूनच अमेरिकेने सुरुवातीलाच त्यांच्या या सागरी ताकदीला लक्ष्य केले आहे. इराणची ‘होर्मुज’ बंद करण्याची धमकी मोडीत काढण्यासाठी अमेरिकेने ही ‘क्लीन-अप’ मोहीम हाती घेतली असल्याचं समोर येत आहे.






