सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हायरल होत असतं. स्वतःला व्हायरल करण्यासाठी लोक वाटेल त्या थराला जाऊ पाहतात. सोशल मीडियावरील अनेक गोष्टी कधी आपल्याला थक्क करतात तर कधी आपल्याला आश्चर्याचा धक्का देऊन जातात. सध्या अशीच एक विचित्र घटना समोर आली आहे. ही बातमी ऐकून नक्कीच तुमच्या पायाखालची जमीन हदरेल. बिहारमधील एका तरुणाने चक्क चाकू, नेलकटरसह एक संपूर्ण चाव्यांचा गुच्छ गिळला आहे. ही घटना सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेक युजर्सना त्याने असे का केले असा गहन प्रश्न पडला आहे. चला तर याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
बिहारच्या पूर्व चंपारण जिल्ह्यातील मोतिहारी येथून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे, जिथे 22 वर्षीय तरुणाच्या पोटातून चाकू, नेल कटर आणि कपाटाची की चेन शस्त्रक्रियेने काढण्यात आली आहे. हे प्रकरण मोतिहारी शहरातील चांदमारी परिसरातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दीर्घकाळ मोबाइलवर गेम खेळण्याच्या व्यसनामुळे तरुणाच्या मानसिक स्थितीवर असा परिणाम झाला होता की, अचानक त्याच्या मनात सुपर ह्युमन बनण्याची इच्छा जागृत झाली. यानंतर तरुणाने एक एक करत सर्व गोष्टी गिळायला सुरुवात केली.
कुटुंबातील सदस्यांच्या म्हणण्यानुसार, मोबाईलवरील जादूगाराचा गेम आणि PUBG सारख्या अनेक धोकादायक गेममुळे प्रभावित होऊन या तरुणाने स्वतःला अशाच प्रकारे साचेबद्ध करण्याचा प्रयत्न केला आणि काही वेळातच या धोकादायक गेममध्ये त्याचा जीव अडकला. आश्चर्यची बाब म्हणजे, इतके सर्व गिळल्यानंतरही त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. दरम्यान, घरच्यांनी गोदरेज अलमिराची चावी शोधली असता ती सापडली नाही, त्यांनी मुलाची विचारपूस केली असता त्याने चावी पोटात असल्याचे सांगितले.
हेदेखील वाचा – क्षणार्धात मच्छरांचा खातमा करते ही मशीन, आनंद महिंद्रांनी शेअर केला भन्नाट Video
कुटुंबीयांना तरुणाच्या म्हणण्यावर विश्वास बसला नाही तरीही त्यांनी तातडीने याची शहानिशा करण्यासाठी जवळील खासगी रुग्णालयात तरुणाला दाखल केले. डॉक्टरांच्या मदतीने त्यांनी अल्ट्रासाऊंड प्रक्रिया पूर्ण केली आणि यातून पोटात धातूसारखे असल्याचे स्पष्ट झाले. तरुणाच्या जीवावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते, त्यामुळे ऑपरेशन करून पोटातून चाकू, नेल कटर आणि चावीची चेन बाहेर काढण्यात आली, हे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. सुदैवाने तरुणाला काहीही झालेले नसून आता त्याची प्रकृती पूर्णपणे ठीक आहे.
आमच्यासाठी ही धक्का देणारी सर्जरी होती, आणि तरुणाला मानसिक आजार असून त्यासंदर्भाती औषधोपचार देण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान या घटनेने आता सोशल मीडियावर धुमाकूळ माजवली असून अनेकजण यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.