(फोटो सौजन्य: Twitter)
सोशल मीडियावर सध्या एका धक्कादायक अपघाताचा थरार शेअर करण्यात आला आहे, जो वेगाने व्हायरल होत आहे. यातील भयानक दृश्ये तुमचा थरकाप उडवू शकतात. ही घटना गुजरातमधील वडोदरा शहरात घडून आली, ज्यामध्ये एका भरधाव कारने चार जणांना चिरडले. या हृदयद्रावक घटनेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. हा व्हिडिओ इतका वेदनादायी आहे की तो पहिल्यांनंतर तुमच्याही अंगावर काटा येईल. व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे प्रकरण?
व्हायरल झालेला व्हिडिओ गुजरातमधील वडोदरा येथील असून, गुरुवारी रात्री करीबाग परिसरात दोन मद्यधुंद तरुण ताशी 100 किलोमीटरहून अधिक वेगाने कार चालवत होते. काही वेळातच कारमध्ये आलेल्या तरुणांनी चौघांना चिरडले. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले. तिथे उभ्या असलेल्या एका व्यक्तीने या अपघाताचा व्हिडिओ बनवला, आणि नंतर तो सोशल मीडियावर शेअर केला. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच तो वणव्यासारखे व्हायरल झाला.
एवढेच नाही तर या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही सोशल मीडियावर समोर आले आहे, ज्यामध्ये हा तरुण भरधाव वेगाने कार चालवत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. काही वेळातच त्याने इतक्या जोराने पुढे जाणाऱ्या स्कूटरला धडक दिली की स्कूटर निघून गेली. ही धडक एवढी भीषण होती की कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले.
लोकांना चिरडल्यानंतर काळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला तरुण गाडीतून बाहेर येतो आणि हवेत हात उंचावून ‘आणखीन एक राऊंड’ असे ओरडायला लागतो. काही सेकंदांनंतर तो ‘ओम नमः शिवाय’ म्हणू लागतो. ड्रायव्हर बाहेर येण्याआधीच सहप्रवासी गाडी सोडून दुसऱ्या दिशेने पळू लागतो आणि जवळच्या लोकांना सांगतो की, गाडी दुसरा व्यक्ती चालवत असल्याने यात त्याचा काही दोष नाही. यानंतर आपल्याला रस्त्यावरचे भीषण दृश्य दाखवण्यात येते, ज्यात रस्त्यावर तीनजण वाईट अवस्थेत पडलेले दिसून येतात.
Driver hits 4 k!lls 1 in Gujarat.
https://t.co/Q4afDcnwA3— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) March 14, 2025
Driver hits 4 k!lls 1 in Gujarat.
https://t.co/Q4afDcnwA3— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) March 14, 2025
या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 2 मिलियनहुन अधिक लोकांनी पाहिले आहे तर अनेकांनी कमेंट्समध्ये या थरारक अपघातावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हा माणूस आणखीन एक राऊंड का बोलत आहे?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तो दारूच्या नशेत होता”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.