(फोटो सौजन्य:Instagram
आजच्या काळात लोक व्हायरल होण्यासाठी नको ते प्रकार करू पाहतात. बऱ्याचदा लोकांचे हे प्रकार यशस्वी देखील होतात. तुम्ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असल्यास तुम्ही इथे असे व्हायरल होणारे अनेक व्हिडिओ यापाहिले असतील. लोक स्वतःला व्हायरल करण्यासाठी धक्कादायक स्टंट्स, जुगाड, डान्स अशा अनेक गोष्टी करू पाहतात. मात्र आता तर हद्दच झाली, नुकताच व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तर महिलेने असा काही पराक्रम करून दाखवला की तो पाहून तुम्ही तुमच्या डोक्यालाच हात लावाल. आता यात नक्की काय घडले ते जाणून घेऊया.
काय आहे व्हिडिओत?
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक म्हैस आरामात बसलेली दिसत आहे. त्याच म्हशीजवळ एक महिला बसली आहे आणि ती असे काही करत आहे की कोणी विचार केला नसेल. बाई तिथे म्हशीचे आयब्रो बनवत बसली आहे. आश्चर्य वाटले, पण व्हायरल व्हिडिओमध्येही तेच पाहायला मिळाले. तुम्ही महिलांनी आयब्रो बनवताना पाहिलं किंवा ऐकलं असेल, पण महिला बसून म्हशीचे आयब्रो बनवताना पाहण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असावी. या अजब-गजब प्रकारामुळे हा व्हिडिओ आता वेगाने शेअर केला जात आहे. लोक हा सर्व प्रकार पाहून थक्क झाले आहेत.
View this post on Instagram
A post shared by TRENDING MEMES || FINANCE || NEWS || POLITICS || FACTS (@timepass_need)
दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ @timepass_need नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे जो चांगलाच व्हायरल होत आहे . आतापर्यंत या व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिले असून हजारोंनी यावर लाइक्स दिले आहेत. तर काहींनी कमेंट्स करत व्हिडिओतील प्रकारावर आपले मत मांडले आहे. एका युजरने लिहिले आहे, “एक लाथ बसेल तेव्हा समजेल” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “म्हैस चांगलीच मजा लुटत आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “यादव ब्युटी पार्लर”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.