नवी दिल्ली : व्हॅलेंटाईन डे (Valentines Day) दरवर्षी या दिवशी म्हणजेच १४ फेब्रुवारीला साजरा केला जातो. या दिवशी जगभरातील लोक भेटवस्तू, शुभेच्छा आणि बरेच काही याद्वारे त्यांचे प्रेमी, मित्र आणि भागीदार यांच्याबद्दल प्रेम व्यक्त करतात. तर दुसरीकडे एका आजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. ज्यामध्ये एक वृद्ध आजी (Grandma) आजोबांना प्रपोज करताना दिसत आहे. पण व्हिडfओ व्हायरल होण्यामागचं कारण आजीचा प्रस्ताव नसून काहीतरी वेगळंच आहे.
वास्तविक, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, शेतात उभी असलेली एक वृद्ध आजी हातात फुल घेऊन बसलेल्या आजोबांसमोर अतिशय रोमँटिक पद्धतीने आपले प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. आजोबांना फूल देताना ती म्हणते, “आय लव्ह यू रामा.” आजोबांना फूल देताना आजी हसताना दिसतात.
[read_also content=”प्रेमाला उपमा नाही! ३५ वर्षांपासून पतीने जपून ठेवल्यात मृत पत्नीच्या अस्थी, झाडाला बांधला कलश आणि दररोज त्यावर डोकं टेकवून घेतोय दर्शन; पुढे झालं असं की… https://www.navarashtra.com/viral/shocking-news-for-35-years-the-husband-kept-the-bones-of-his-dead-wife-tied-the-urn-to-the-tree-and-bowed-his-head-nrvb-369754.html”]
पण त्यांचे पुढे काय होणार आहे याची त्यांना कल्पना नाही. आजीच्या प्रस्तावानंतर आजोबांची प्रतिक्रिया पाहून लोक सुन्न झाले. कारण आजोबांनी आजीच्या कानाखाली एक सणसणीत जाळ काढला. हे पाहून लोक मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ इंस्टाग्राम सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर beautiful_world_pixs नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.
[read_also content=”ती युवतीला पाजत होती दूध, मस्कने केलं ट्विट, सोशल मीडियावर झाला राडा; लोकांनी अश्लील म्हणत त्याचीच घेतली शाळा https://www.navarashtra.com/viral/elon-musk-twitter-ceo-shares-picture-meme-people-tell-what-message-behind-this-nrvb-369690.html”]
ज्याला युजर्सकडून खूप पसंती दिली जात आहे. या व्हिडिओला आतापर्यंत १ हजाराहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. यासोबतच युजर्स व्हिडिओ पाहिल्यानंतर खूप बडबड करत आहेत आणि त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.