(फोटो सौजन्य – Instagram)
काय घडलं व्हिडिओत?
इंटरनेटवर वेगाेने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक वधू आपल्या मित्रासोबत गाडीत बसून तिच्या प्रियकराला भेटायला जात असल्याचे दिसते. अखेर ती वेळ येते आणि गाडी थांबते. समोर उभ्या असलेल्या आपल्याला प्रियकराला पाहताच वधू गाडीतून उतरते आणि त्याच्या जवळ जाऊन त्याची भेट घेते. काहीवेळ त्यांच्यात संभाषण रंगते. नक्की त्यांच्यात काय बोलणं झालं असाव हे स्पष्ट ऐकू येत नसलं तरी यामागील भावना आणि त्यांना होणारं दुःख अनेकांनी समजून घेतलं. वधूच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार, वधू फेऱ्यांच्या दोन तासाआधी प्रियकराला भेटायला आली असून तिने बरीच विनंती केल्यानंतर तिचा मित्र तिला आपल्या प्रियकराला प्रियकराला घेऊन आला. वधूच्या घरचे त्यांच्या विवाहासाठी तयार नसल्याने मजबूरीमध्ये ती लग्नासाठी तयार झाली असेही मित्राने स्पष्ट केले. व्हिडिओत काहीवेळ संभाषण केल्यानंतर दोघेही मिठीने या भेटीचा शेवट करतात आणि वधू पुन्हा गाडीत बसून लग्नाच्या ठिकाणी परतताना दिसून येते.
दरम्यान घटनेचा व्हिडिओ @chalte_phirte098 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत मिलियूनहून व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “कृपया मला सांगा की हे स्क्रिप्टेड होते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मला वराबद्दल वाईट वाटते” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “जर ते खरं असेल तर मला तिच्या नवऱ्याबद्दल खूप वाईट वाटतं”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






