(फोटो सौजन्य: X)
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातच्या सुरतमधील रहिवासी जिग्नेश तलाविया (३६ वर्षे) याचे शेअर मार्केटमध्ये ५० लाख रुपयांचे नुकसान झाले होते. हे नुकसान भरुन काढण्यासाठी त्याने अपहरणाचा बनाव केल्याचा कथित दावा केला आहे. जिग्नेश अचानक बेपत्ता झाला ज्यानंतर कुटुंबियांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. काही तांसांनी कुटुंबियांच्या फोनवर एक व्हिडिओ पाठवण्यात आला ज्यात जिग्नेशला किडनॅप केल्याचे दृष्ये दिसले. व्हिडिओमध्ये जिग्नेशला दोरीने बांधल्याचे दिसले तसेच त्याच्या तोंडात कापडाचा एक गोळा देखील भरण्यात आला होता.
जिग्नेशच्या किडनॅपिंगचा व्हिडिओ पाहताच कुटुंब घाबरले आणि त्यांनी पोलिस स्थानकात धाव घेतली. अपहरणकर्त्यांनी ५० लाख रुपयांची मागणी केली होती. हे पैसे पाठवले नाहीत तर जिग्नेशचा मृतदेह घरी मिळेल अशी धमकीही कुटुंबियांना देण्यात आली होती. हा सर्व प्रकार पोलिसांपर्यंत पोहताच पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला. व्हिडिओ बारकाईने तपासल्यानंतर तो गुजरातमध्येच शूट करण्यात आल्याचे पोलिसांच्या ध्यानात आले.
गुजरात के सूरत शहर से एक अपहरण और 50 लाख रुपये की फिरौती मांगने का एक ऐसा मामला सामने आया है! जिसके बारे में सुनकर आप भी दंग रह जाएंगे। सूरत शहर के मोटा वराछा इलाके में रहने वाले एक व्यक्ति जिग्नेश तलाविया ने खुद के ही अपहरण करने की झूठी कहानी गढ़ी अपने ही पत्नी के मोबाइल पर… pic.twitter.com/T3dSp2Lqv4 — Nilesh (@Drx_Nilesh7) June 19, 2026
पोलिसांना तपासात अनेक संशयास्पद त्रुटी आढळून आल्या ज्याच्या जोरावर त्यांनी शोधमोहिम सुरु केली. अखेर ग्रोधा येथील हाॅटेलमधून जिग्नेशला पकडून त्याचा सर्व बनाव उघड करण्यात आला. पोलिस चाैकशीत जिग्नेशने घटनेची सर्व खरी कुबुली दिली आणि सांगितले की, शेअर मार्केटच्या ट्रेडिंगमध्ये मोठे नुकसान झाल्याने ते भरुन काढण्यासाठी त्याने हा अपहरणाचा बनाव केला. आरोपानुसार त्याने अपहरणाची खोटी कहाणी रचली, पोलिसांची दिशाभूल केली, सरकारी संसाधनांचा गैरवापर केला आणि तपास यंत्रणांचा मौल्यवान वेळ वाया घालवला. ज्यामुळे पोलिसांनी न्यान संहितेच्या कलमांनुसार जिग्नेशवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






