झुकेगा नही… Graduation Day ला सरांची पुष्पा स्टाईल ; Gen Alpha मुलांसोबत पोज देतानाचा VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
काय आहे व्हिडिओत?
असे म्हणतात शिक्ष आणि विद्यार्थ्याचे नाते केवळ ज्ञानापुरते मर्यादत नसते. मैत्री आणि विश्वासाचे नाते असते. शिक्षकाने विद्यार्थ्याला केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्यात सहभागी झाले पाहिजे. यामुळे मुलांचा त्यांच्यावरील विश्वास वाढतो.सध्याच्या जमान्यात तर शिक्षक आणि विद्यार्थ्याची परिभाषा बदलले आहे. अनेक शिक्षक आपल्या मुलांसोबत त्यांच्या सोशल मीडिया युगातील गोष्टी शिकत असतात. त्यांना समजेल अशा हटके आणि सोशल मीडिया स्टाईलमध्ये ज्ञान देतात. याचेच एक उदाहरण म्हणजे हा व्हायरल होणार व्हिडिओ आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, लहान मुलांचा ग्रॅज्युएशन जे सुरु आहे. यावेळी प्रमाणपत्र वाटप करताना प्रोफेसर Gen Alpha मुलांमध्ये सहभागी झाले आहेत. त्यांच्या स्टाईलमध्ये पोज देत आहे. एका व्हिडिओत पुष्पा पोझ प्रोफेसरने आपल्या विद्यार्थ्यासोबत दिली आहे. यासारखे आणखी काही व्हिडिओ देखील शेअर करण्यात आले आहे. हा व्हिडिओ अनेकांच्या पसंतीस पडत आहे.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @vethalogavidhyalayacbse या अकाउंटवर शेअर करण्याता आला असून याला हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. अनेकांना यावर हार्टचे इमोजी शेअर केले आहे. एका नेटकऱ्याने सरांसाठी खूप आदर.. किती सहजपणे मुलांमध्ये सामील झाले असे म्हटले, तर दुसऱ्या एकाने Pookie Sir अशी कमेंट केली आहे. आणखी एकाने आजच्या दिवसातील हा सर्वात सुंदर व्हिडिओ असल्याचे म्हटले आहे. तर लोकांनी आमचे शिक्षक असे का नव्हते असा प्रश्न केला आहे.
पति परमेश्वरची अनोखी पूजा! जमिनीत गाढलं अन् वाहिलं दूध; VIDEO पाहून लोक चक्रावले, म्हणाले…
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






