(फोटो सौजन्य: Youtube)
काय आहे प्रकरण?
महिलेचे नाव कॅसी असून तिच्या पतीचे दम्याच्या झटक्याने निधन झाले होते. पतीच्या निधनानंतर कॅसीच्या आयुष्यात मोठी उलथापालथ झाली. पतीच्या निधनानंतर कॅसीला फार दुःख झाले. तिने शेवटपर्यंत पतीच्या अस्थी आपल्या जवळ सांभाळून ठेवल्या. अस्थींना चाटण्याची तिची ही सवय फार योगायोगाने सुरु झाली. एकेदिवशी बॉक्समध्ये साठवून ठवलेली पतीची अस्थी तिच्या हातांवर पडली. यांनतर या अस्थींना फेकणे किंवा झाडणे कॅसीला योग्य वाटले नाही. यामुळे तिने हातावर पडलेली ही अस्थी चाटून साफ केली. इथूनच एक अनोखे व्यसन सुरु झाले ज्याने संपूर्ण जगाला हादरवून सोडले.
आम्ही तुम्हाला सांगतो की, कॅसीची ही कथा सर्वात आधी २०११ मध्ये टीएलसीच्या लोकप्रिय टीव्ही शो, माय स्ट्रेंज ॲडिक्शनमधून समोर आली. कॅसीच्या या व्यसनावर आरोग्य तज्ज्ञ चिंता व्यक्त करतात. त्यांचं म्हणणं आहे की, अंत्यसंस्कारानंतर उरलेल्या त्या राखेत आणि रासायनिक आणि विषारी घटक आढळून येतात जे मानवी शरीरासाठी चांगले नाही. कॅसीची मुलाखत सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. दरम्यान कॅसीचे हे व्यसन ‘पिका’ नावाच्या खाण्याच्या विकाराशी संबंधित आहे ज्यात व्यक्तीला माती, केस, कागद, सिमेंट, वीट, धातू यांसारख्या गोष्टी खाण्याची सवय लागते.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






