लोकं पायलटचं रोमँटिक सरप्राईज! घरामागून ट्रेन धावताच हॉर्नमध्ये वाजवलं ‘I Love You’; पती-पत्नीचा क्यूट मूमेंट व्हायरल (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
असेच काहीसे या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आहे. एका महाराष्ट्रातील लोको पायलटने आपल्या पत्नीसाठी एक खास असे सरप्राइज दिले आहे. या व्हिडिओमध्ये एका घरामागून ट्रेन जात आहे. याच वेळी ट्रेनचा लोको पायलटल एक अनखो हॉर्न वाजवतो. या हॉर्नमधून लोको पायटलने प्रेम व्यक्त केले असल्याचे व्हिडिओ शेअर करत त्याच्या पत्नीने म्हटले आहे. लोकांनाही हा व्हिडिओ पसंत पडला असून सध्या याचीच चर्चा सोशल मीडियावर जोरदार सुरु आहे. व्हिडिओ शेअर करत हिमांगी शिंदे नावाच्या महिलेने लिहिले आहे की, माझा नवरा, अशा प्रकारे मला Hi म्हणतो मला सांगतो की बायको मी तुझ्याकडे पाहत आहे. या व्हिडिओमध्ये लोको पायलट ट्रेनच्या दरवाज्याजवळ उभा असल्याचे दिसत आहे.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @hemangivibes_ या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओ पाहून लोकांनी स्वत:चे अनुभव शेअर केले आहेत. काही लोकांनी किती रोमॅंटिक असे लिहिले आहे, तर काहींनी किती गोड असे लिहिले आहे. व्हिडिओमध्ये केवळ खिडबाहेरचे दृश्य दिसत आहे. यामध्ये एक ट्रेन रेल्वेरुळावरुन जात असून एक हॉर्न वाजतच असल्याचे दिसत आहे. पण पत्नीच्या म्हणण्यानुसार, हे तिच्या नवऱ्याने तिच्यासाठी प्रेम व्यक्त केले आहे.
रॅपिडो टॅक्सी चालकाचा उर्मटपणा! प्रवाशाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण; कारण ऐकाल तर.. Video Viral
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






