स्टाईलच्या नादात झाला 'लोचा'! रिल बनवताना महिलेचा पायऱ्यांवरुन तोल गेला अन्..., पाहा पुढं काय घडलं? Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
‘आंबे घ्या आंबे’, साडी नेसून विदेशी रस्त्यावर आंबा विकताना दिसली भारतीय महिला; VIDEO तुफान व्हायरल
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ पाहू शकता, दोन महिला अतिशय स्टालिश अंदाजात पायऱ्या उतरत आहेत. त्यांचा आत्मविश्वास एखाद्या फिल्म स्टारसारखा आहे, चेहऱ्यावरील हावभाव, चालण्याची स्टाईल, आणि बॅकग्राउंड म्युझिकमुळे कोणतातरी मोठा शो असल्यासारखे वाटत आहे. कॅमेराही योग्य अँगलवर सेट करण्यात आला आहे. यामुळे व्हिडिओ एकमद क्लासी दिसत आहे.
मात्र, महिला पायऱ्या उतर असताना अचानक तोल जातो, ज्यामुळे कॅमरासमोरच तिची फजिती होती. महिलेला सावरण्याचा वेळही मिळत नाही. ती उलटी गोल गंटागळ्या खात खाली पडली आहे. सुदैवाने महिलेला कोणतीही दुखापत झालेली नाही. हे दृश्य इतके मजेदार होते की व्हिडिओ बनवणाऱ्यालाही हसू आवरले नाही.
व्हायरल व्हिडिओ
दीदी रील बना रही थी… लेकिन सीढ़ियों ने स्क्रिप्ट बदल दी 💀😂 pic.twitter.com/RCuHJksqGu — Prisha (@Prisha42i) May 12, 2026
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Prisha42 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. अलीकडे व्हायरल होण्यासाठी लोक कधी काय करतील सांगता येत नाही असे एकाने म्हटले आहे. तर दुसऱ्या एकाने ताई जरा दमाने असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वेगाने व्हायरल होत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






