Kolhapur Zilla Parishad elections:कागलच्या राजकारणात नवे समीकरण; मंडलिकांसमोर मुश्रीफ-घाटगे युतीचे आव्हान
गेले अकरा वर्षे एकमेकांच्या विरोधात काट्याची टक्कर देणारे मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजीत सिंह घाटगे कागल नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्यामध्ये अचानक युती झाली. दोन्ही नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने एकत्र येण्याचा निर्णय घेतला. कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनीही त्यांचा हा निर्णय स्वीकारला. दोन्ही गटाचे कार्यकर्ते कसे एकत्र येऊ शकतात हे आगळे वेगळे उदाहरण कागल नगरपरिषदे मध्ये घडले. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे प्रा संजय मंडलिक लढले. परंतु त्यांचा दारुण पराभव झाला. (Kolhapur News)
आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये मंत्री हसन मुश्रीफ, समरजीत सिंह घाटगे आणि माजी आमदार संजय घाटगे एकत्र येतील. त्यांच्या विरोधात प्रा. संजय मंडलिक व त्यांचे समविचारी अशी लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये प्रा. मंडलिक कशी टक्कर देतात हे येणारा काळच ठरवेल.
कागल तालुक्यात जिल्हा परिषदेचे सहा तर पंचायत समितीचे बारा मतदार संघ आहेत. यामध्ये महिलांना संधी आहे. जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर झाले आहे. यामध्ये कसबा सांगाव, बोरवडे, चिखली, सेनापती कापशी या चार मतदारसंघांमध्ये महिलांसाठी आरक्षण असून केवळ म्हाकवे हा मतदारसंघ नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. त्यामुळे कागल तालुक्यात जिल्हा परिषदेमध्ये महिलाराज आहे. (Kolhapur Zilla Parishad Election 2026)
Malegaon Election : मतदान करा अन् खरेदीवर सूट मिळवा! मालेगावच्या कापड व्यापारी असोसिएशनतर्फे अनो
निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असणाऱ्या मंडळींना आरक्षणाचा मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आपल्या पत्नीस, बहिण, भावजय, सून किंवा जवळच्या कार्यकर्त्याच्या पत्नीला उमेदवारी मिळावी यासाठी कार्यकर्त्यांनी नेत्यांशी संपर्क सुरू ठेवला आहे.
जिल्हा परिषदेच्या मतदार संघांतर्गत असणारे आरक्षण आणि गावे अशी कसबा सांगाव गट: (अनु. जाती महिला) कसबा सांगाव, सुळकूड, रणदिवेवाडी, मौजे सांगाव, लिंगनूर दुमाला, करनूर, वंदूर, पिंपळगाव खुर्द.सिद्धनेर्ली गट:(नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला) सिद्धनेर्ली, व्हन्नुर, एकोंडी, शंकरवाडी, शेंडूर, साके, बामणी, गोरंबे, व्हन्नाळी, केनवडे, सावर्डे खुर्द, पिंपळगांव बुद्रुक.
बोरवडे गट:(सर्वसाधारण महिला) सावर्डे बुद्रुक, केंबळी, बेलवळे खुर्द, बेलवळे बुद्रुक, बाचणी, वाळवा खुर्द, पिराची वाडी, बोरवडे, बिद्री, सोनाळे, निढोरी, उंदरवाडी, फराकटेवाडी.म्हाकवे-गट:(नागरीकांचा मागास प्रवर्ग)
म्हाकवे, बाणगे, अणुर, मळगे खुर्द, मळगे बुद्रुक, चौंडाळ, भडगांव, यमगे, चिमगांव, अवचितवाडी, शिंदेवाडी, कुरणी, सुरुपली, कुरुकली, सोनगे.
चिखली- (सर्वसाधारण महिला)
चिखली, कौलगे, बस्तवडे, खडकेवाडी, हमीदवाडा, हळदी, गलगले, अर्जुनी, लिंगनूर कापशी, अर्जुनवाडा, दौलतवाडी, बेनिक्रे, हळदी, मेतके, करड्याळ, जैन्याळ. कापशी-गट (नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला) कापशी, बाळिक्रे, मुगळी, नंद्याळ, बाळेघोल, हणबरवाडी, तमनाकवाडा, हळदवडे, बेलेवाडी मासा, करंजीवणे, माद्याळ, वडगांव, आलाबाग, कासारी, बेलेवाडी काळम्मा, हसूर खुर्द, बोळावीवाडी, बोळावी, ठाणेवाडी, हसूर बुद्रुक, मांगनूर.






