फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट
सोशल मीडियावर दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर तर कधी थरारक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. डान्स रिल्स, तसेच जुगाड आणि स्टंट यांसारखे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. अलीकडे स्टंटबाजीचे प्रमाण तर प्रचंड वाढले आहे. विशेषत: तरुणांचा यामध्ये जास्त समावेश असतो. सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी लोका आपल्या जीवाचा विचार देखील करत नाहीत.
सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ दोन महिन्यापूर्वीचा असून हा व्हिडिओ परत एकदा जोराने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी हा व्हिडिओ पाहिल्यावर अशा लोकांवर कारवाई व्हावी असे म्हटले आहे. यामध्ये दोन तरुण बांधकाम सुरू असलेल्या पुलावर स्टंटबाजी करताना दिसत आहेत. अनेकांचे म्हणणे आहे की, अशा स्टंटमुळे समाजात चुकीचा संदेश पसरत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन तरुण बांधकाम सुरु असलेल्या उड्डाण पुलावर उभे आहेत. याच व्हिडिओ रस्त्यावरुन जाणाऱ्या एका व्यक्तीने रेकॉर्ड केला आहे. ही दोन्ही तरुण मुले अर्ध बांधकाम झालेल्या पुलावर फोटो शुट करत आहे. पुल अगदी तिरका बांधलेला दिसत असून व्हिडिओ पाहिल्यावर धोकादायक वाटत आहे. चूकून मुलांचा पाय घसरुन ते खाली पडले तर त्यांच्या जीवावर हे बेतू शकते हे त्यांच्या लक्षात येत नाही. सध्या यांचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
आज सकाळी घरून होळकर गार्डनच्या ऑफिसला निघालो असता अचानक पुलावरचे दृष्य पाहून मला धक्काच बसला…
कारण कात्रज चौकातील प्रस्तावित धर्मरक्षक छत्रपती श्री. संभाजी महाराज उड्डाण पुलावर सुरक्षेचे तीन तेरा नऊ बारा वाजवले जात होते…, pic.twitter.com/jDHWVXlxWM
— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) October 25, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @vasantmore88 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी अशा लोकांवर कारवाई केली पाहिजे असे म्हटले आहे. एका युजरने म्हटले आहे की, व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “आज सकाळी घरून होळकर गार्डनच्या ऑफिसला निघालो असता अचानक पुलावरचे दृष्य पाहून मला धक्काच बसला… , कारण कात्रज चौकातील प्रस्तावित धर्मरक्षक छत्रपती श्री. संभाजी महाराज उड्डाण पुलावर सुरक्षेचे तीन तेरा नऊ बारा वाजवले जात होते…”. हा व्हिडिओ जुना असून पुन्हा एकदा व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.