काय तो डान्स अन् काय ते हावभाव! हरियाणवी गाण्यावर चिमुकलीच्या अदा पाहून नेटकरी फिदाच.. ; VIDEO तुफान व्हायरल (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Viral News Marathi : सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, कधी चित्र-विचित्र, कधी भयावर व्हिडिओ पाहायला मिळतात. काही व्हिडिओ आपले लक्ष असे वेधून घेताता की एकदा पाहूनही मन भरत नाही. लहान मुलांचे तर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये विशेष करुन चिमुकल्यांच्या भन्नाट अशा डान्सचे व्हिडिओ तर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मोठ्या मोठ्या प्रोफेशनल डान्सर्सला लाजवतील असे स्टेप्स, हावभाव देत अलीकडची लहान मुले भन्नाट असा डान्स करतात. सध्या असाच एक छोट्याशा गोड मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.
या गोड मुलीचे नाव दिशू यादव आहे. सध्या हिचा एका हरियाणवी गाण्यावर एक भन्नाट डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तिने बस मंगलवार को ना पीते या गाण्यावर जबरस्त असा डान्स केला आहे. सध्या हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे. यामध्ये तिचे हावभाव, तिचा डान्स, स्टेप्स, अगदी भन्नाट आहेत. तिच्या पुढे मोठ मोठ्या अभिनेत्री देखील फिक्या पडतील. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने निळ्या रंगाचा ड्रेस घातलेला आहे. तसेच ती हरियाणवी गाणे मंगलवार को ना पीते वर अगदी भन्नाट असे एक्सप्रेशन देत डान्स करत आहे. कंबरेवर हात ठेवून मस्त असा ठूमका मारला आहे. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @aapkidishu_ या अकाउंटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओला लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर भन्नाट अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने “दिशू बेटा तुला खूप खूप प्रेम” असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका युजरने देखील “दिशू बेटा, माझी लाडो देव तुला खूप आशीर्वाद देवो” असे म्हटले आहे. तिसऱ्या एकाने “सुपरस्टार” असे म्हटले आहे. तर आणखी एकाने “किती गोड डान्स करते” असे म्हटले आहे. अनेकांनी यावर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.