फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. सध्या एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. तुम्ही पाहिले असेल की अलीकडे आतीशबाजी करणे ट्रेंड बनत चालले आहे. कोणताही कार्यक्रम असुदेत फटाके फोडल्याशिवाय त्याची सुरूवात होत नाही. मात्रअनेकदा यामुळे अपघात देखील झाले आहेत. अचानक फटक्यांमुळे आग लागून अनेकांना दुखापत झाली आहे किंवा जीव गमवावा लागला आहे.
सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ उत्तप्रदेशच्या सरहानपूरचा असल्याचे व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सांगण्यात आले आहे. एक लग्नाच्या वरातीत सनरुफवरुन आतीशबाजी सुरू होती. त्याच वेळी अचानक गाडीत फटाके फुटले अन् गाडीला आग लागली. यामध्ये असलेली माणसे लगेच बाहेर आली पण आगीने असा पेट घेतला की, गाडी संपूर्ण जळाली. सध्या या घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
गाडीतच फटाके फुटले
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण कारच्या सनरुफवरुन फटाके फोडत असल्याचे दिसत आहे. त्याच वेळी अचानक कारला आग लागते. आणि काही वेळातच कारच्या आतमध्ये फटाके फुटू लागतात.यानंतर तात्काळ गाडीतील माणसे बाहेर येतात. आग अचानक पेट घेते. त्यानंतर घटनास्थळ असलेल्या लोक आग आटोक्यात आणतात.मात्र कार जळून पूर्ण खाक झालेली असते. या घटनेत कोणाला कोणतीही दुखापत झालेली नाही. मात्र, या घटनेवरुन तुम्ही लक्षात घेऊ शकता की, निष्काळजीपण आपल्याला कितीमहागात पडू शकतो.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
सावधान🧯
लापरवाही के कारण पटाखों से जली दूल्हे की कार
सहारनपुर में बारात के दौरान दूल्हे की कार पर गिरी चंगारी, जिससे कार जलकर राख हो गई. pic.twitter.com/q5KSG1uWNk
— Priya singh (@priyarajputlive) November 27, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @priyarajputlive या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये या घटनेची माहिती देण्यात आली आहे. या व्हिडिओला पाहून अनेकांचा थरकाप उडाला आहे. अशा घटनांमधून खरे तर निष्काळजीपण कसा महागहात पडू शकतो हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. मात्र तरीही लोक अशा चुका पुन्हा करतात आणि आपल्या जीव धोक्यात घालतात. या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, फटाक्यांचा वापर जपून केला पाहिजे, दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, भाऊ पण, आता त्याचा दहेजचा पैसा पूर्ण पाण्यात गेला. अशी टीका केली आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.