फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहिल्यावर आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे व्हिडिओ पाहायला मिळतात जे पाहिल्यावर आपले मनोरंजन होते. कधी जुगाड, तर कधी स्टंट, कधी भांडणांचे असे अनेक व्हिडिओ आपल्या पाहायला मिळतात.अनेकदा काय गोष्टी समोर येतील याचा नेम नसतो. अनेजण सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी असे स्टंट करतात की मनात एकतच प्रश्न येतो की जीव एवढा स्वस्त: झाला आहे का?
अनेकदा तुम्ही पाहिले असेल की, अनेकजण कधी पाण्याच्या टाकीवर तर कधी बिल्डींगवर चढून स्टंट करत असतात. तसेच काहीजण विजेच्या तारांवर देखील स्टंट करताता. सध्या असाच एक तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच ही तरुणी विजेच्या ट्रान्सलफटर्मर्सवर चढलेली आहे. सध्या हा व्हिडिओ चर्चेचा विषय बनलेला आहे. हा व्हिडिओ भारतातील नसल्याचे त्या तरुणीवरुन लक्षात येते.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक विजेच्या ट्रान्सफॉर्मर्स दिसत आहे. तिथे काही कर्मचारी देखील आहेत. तसेच ही तरुणी त्या ट्रान्सफॉर्मर्सवर चढलेली आहे. तीच्या या कारणान्यामुळे कर्मचाऱ्यांना लाईटचा पुरवठा बंद करावा लागला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, हा अमेरिकेतील आहे. एकूण 800 घरांची लाईट बंद करावी लागली होती. या मुलीच्या वागण्यावरु असे दिसून येत आहे की, ही मुलगी मद्यधुंद अवस्थेत आहे. या व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घातली आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @vash_elektrik_24_7_uka या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले असून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. एका युजरने म्हटले आहे की, हिच्यामुळे किती लोकांना त्रास सहन करावा लागला असेल. दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, पॉवर बंद करायला नको होती. आणखी एका युजरने म्हटले आहे की, हा देशामद्ये वाढलेल्या फ्रस्टंशनचा भाग आहे. चौथ्या एका युजरने म्हटले आहे की, ही देशी दारुची कमाल असल्याचे वाटते. तसेच अनेकांनी सल्ला दिला आहे की असे स्टंट कोणी घरी करु नयेत यामुळे तुमचा जीव देखील जाण्याची शक्यता आहे. अशा प्रतिक्रीया अनेक लोकांनी दिल्या आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.