फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहिल्यावर आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहून हसू आवरणे कठीण होऊन जाते. जुगाड, डान्स, भांडण स्टंट असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनेकदा लोक असे स्टंट करताता री पाहून डोके चक्रावेल. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
एका तरुमाने असे काही केले आहे की, व्हिडिओ पाहिल्यावर तुम्ही देखील हैराण व्हाल. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी कपाळाला हात लावला आहे. हा व्हिडिओ कुठला आहे अद्याप कळालेले नाही. हा व्हिडिओ सापाशी संबंधिता असून तरुणाने चक्क सापांना उचलून गरागरा फिरवले आहे. अनेकदा असे लोक अशी खोडी करतात की त्यांना काय बोलावे ते कळत नाही. प्राण्यांना देखील ते सोडत नाही.
सापाला गरागरा फिरवून दिले
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक शेतात दोना सापांची झुंज चालू आहे. तिथेच एक तरुण देखील उबा आहे. तो त्या सापांना बघत आहे. अचानक तो त्या सापांवर झपट मारतो मात्र, लाप तिथून पळून जातात. तो तरुण त्यांच्या मागे जातो. तरुण सापांना पकडण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच वेळी तो एका सापाला पकडतो. नंतर तो त्या सापाला गरागरा फिरवतो आणि पळत सुटतो. याचा व्हिडिओ त्याच्याच एका मित्राने रेकॉर्ड केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
Reason why women live longer than men 💀 pic.twitter.com/zdSTqv2zjh
— Vijay (@veejuparmar) November 18, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @veejuparmar या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले असून अनेकांनी कपालाला हात लावाला आहे. तसेच अनेकांनी मजेशीर प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, बिचारा साप, तर दुसऱ्या एकाने म्हटले आहे की,भाई जाम खरतनाक आहे पोरंग. तिसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, ये है असली खतरों का खिलाडी. आणखी एकाने म्हटले आहे की, यार रोहित शेट्टीला सांगा याला त्या शोमध्ये घेण्यास. चौथ्या एका युजरने इतरांना सल्ला दिला आहे की, हे महागात पडू शकते अरे काही करायला जाऊ नका.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.