माकडाची अनोखी डील! मोबाईलच्या बदल्यात घेतला मॅंगो ड्रिंक; VIDEO तुफान व्हायरल (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर रोज काही नाहा काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र असे व्हिडिओ पाहायला मिळतात. डान्स, स्टंट, जुगाड, भांडण यांसारखे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. याशिवाय प्राण्यांशी संबंधित देखील अनेक व्हिडिओ सतत व्हायरल होतात. सध्या असाच एक माकडाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला तुमच्या बालपणीच्या माकड आणि टोपीवाल्याच्या गोष्टीची आठवण येईल.
माकडांना मानवाचे पूर्वीचे वंशज मानले जाते. यामुळे माणसांप्रमाणेच वागतात. हे अनेकवेळा सिद्ध देखील झाले आहे. या व्हायरल होत असलेला व्हिडिओत एका माकडाने तरुणाचा महागातला मोबाईल चोरला आहे. आणि तो परत करण्याच्या बदल्यात मॅंगो ड्रिंक घेतले आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, वृदांवनमधील परिसर दिसत आहे. भाविकांची मोठी गर्दी जमलेली आहे. याचवेळी एक माकड सर्वांच लक्ष वेधून घेते.
माकड उंच भिंतीच्या कठड्यावर बसलेले आहे. त्याच्या हातात सॅमसंगचा महागडा मोबाईल दिसत आहे. तिथेच एक व्यक्ती माकडाकडून मोबाईल फोन परत घेण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र माकड मोबाईल परत करत नाही. मग याच वेळी एक व्यक्ती मॅंगो ड्रिंक घेऊन येतो. ते ड्रिंक माकडाला देतो आणि माकड याबदल्यात मोबाईल परत करतो. माकडाच्या अशा वागण्याने अनेकजण आवाक् झाले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
Monkey Steals Samsung S25 Ultra in Vrindavan, Returns It For Mango Drink- #Watch #Monkey #SamsungS25Ultra #Vrindavan #ViralVideo pic.twitter.com/BQxqPtviyt
— TIMES NOW (@TimesNow) March 17, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @TimesNow या अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे. या व्हिडिओला लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडिओ मोठ्या प्रमावर व्हायरल होत आहे. अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने भाऊ, बिझनेस मॅन आहे. तर दुसऱ्या एका युजरने भाऊचा स्वॅगच वेगळा आहे. अनेकांनी हसण्याचे इमोजी देखील शेअर केले आहेत. सध्या हा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.