(फोटो सौजन्य: X)
जंगलातील विशाल प्राण्यांमध्ये हत्तीचा समावेश होतो. तो आपल्या भल्यामोठ्या शरीरासाठी ओळखला जातो. मात्र हत्ती हा प्राणी मुख्यतः शांत प्रवृत्तीचा आहे. असे म्हटले जाते की हत्ती केवळ शक्तिशाली नसून ते खूप भावनिक प्राणी आहेत. माणसांप्रमाणेच त्यांनाही प्रेम आणि मैत्रीची खोल समज आहे. सध्या यासंबंधीचाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून आता युजर्स भावूक झाले आहेत. यात एक हत्ती आपला 25 वर्षांच्या साथीदार गमावल्याच्या दु:खात रडताना दिसून आला.
रशियातील कझान शहरात जेनी आणि मॅग्डा नावाचे दोन हत्ती गेल्या 25 वर्षांपासून एकत्र राहत होते. दोघेही सर्कसमध्ये परफॉर्मन्स करायचे आणि त्यांची मैत्री अनुकरणीय होती. पण अलीकडेच जेनीचा अचानक मृत्यू झाला आणि तिची जोडीदार मॅग्डा उद्ध्वस्त झाली. व्हिडिओमध्ये असे दिसून येते की मॅग्डा वारंवार जेनीला ढकलून उठवण्याचा प्रयत्न करते, परंतु जेव्हा तिला कळते की तिचा जोडीदार पुन्हा कधीच उठणार नाही तेव्हा तीला अश्रू अनावर होतात. यानंतर, मॅग्डा जेनीच्या शेजारी बसते आणि रडायला लागते आणि शेवटच्या वेळी तिला मिठी मारते.
जेनी आणि मॅग्डा रशियन शहरातील कझानमधील सर्कसमध्ये परफॉर्म करत असत, परंतु दोन घटनांनंतर 2021 मध्ये निवृत्त झाले. एका कार्यक्रमादरम्यान दोन हत्ती आपापसात भांडू लागले, त्यामुळे प्रेक्षक पळून गेले. प्रशिक्षकांचे लक्ष वेधण्यासाठी ही लढत असल्याचे सर्कस प्रशासनाने सांगितले. एका आठवड्यानंतर, हत्तींनी त्यांच्या प्रशिक्षकावर हल्ला केला, ज्यामुळे दोन मणक्याचे फ्रॅक्चर, तुटलेल्या बरगड्या आणि फुफ्फुस पंक्चर झाले. यानंतर शो बंद करण्यात आला आणि दोन्ही हत्तींना रिटायर करण्यात आले. रिटायरमेंटनंतर हे दोन हत्ती एकत्र राहत होते, पण जेनीच्या अचानक मृत्यूने मॅग्डा पूर्णपणे एकटी पडली.
Remember the Russian circus elephants who fought so fiercely in 2021 they terrified the crowd in Kazan?
Baza reports that Magda & Jennie were sent to retire in Crimea, made peace, and stayed together—until Jennie died this week.
Magda’s grief speaks volumes. pic.twitter.com/Xi3MnA14l5
— Brian McDonald (@27khv) March 14, 2025
पिल्लू पाण्यात पडताच सिंहिणीचा जीव झाला कासावीस, डोळ्यात साठले अश्रू अन् शेवटी जे घडलं… Video Viral
दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ @27khv नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले असून अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “शब्दच नाहीत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “गरीब प्राणी” आणखीन एका युजरने लिहिले आहे, ” हे हृदयद्रावक आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.