फोटो सौजन्य - Social Media
छंद आणि हाऊस जोपासण्याला काही वयाच्या मर्यादा नसतात. खरं तर, त्या नसल्याचं पाहिजेत. पहिलेच आयुष्य छोटे आहे, त्यात आयुष्य लाजून जगाल तर त्या जगण्याला काहीच अर्थ नसतो. सोशल मीडियावर एका चाचांचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. छंद जोपासण्यात आणि जीवाची हाऊस पुरवण्यात कसलं आलंय वय? याचे उत्तम उदाहरण हे वृद्ध चाचा आहेत. व्हायरल व्हिडिओतील या चाचांनी वयाची सत्तरी तरी गाठलीच असेल. तरी या वयात त्यांनी केलेला त्यांचा डान्स आणि त्यामागचा जोश तरुणाईलाही हमखास लाजवेल. नेटकरी तर विचारात पडले आहेत कि या वयात या माणसामध्ये जोश आला तरी कुठून?
सदर व्हिडीओ भारतातील असून व्हिडिओमध्ये चाचा अभिनेता अजय देवगण आणि उर्मिला मातोंडकरच्या दिवाने चित्रपटातील ‘कयामत कयामत’ या गाण्यावर बिनधास्त नाचत आहेत. अगदी वयाचे भान सोडून चाचा बेभान होऊन त्यांची हाउस पूर्ण करून घेत आहेत. चाचा डान्ससह चेहऱ्यावर दिलेल्या एक्सप्रेशनमुळे सोशल मीडियावर गाजत आहेत. चाचांचा नृत्य पाहून बघी मंडळी तर दंगच झाली आहे. चाचा नक्कीच त्यांच्या तरुणपणी एक उत्तम नृत्य कलाकार असतील असे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.
हे सुद्धा वाचा : शिक्षण पूर्ण झालंय पण जॉब नाही मिळत? ‘या’ क्षेत्रामध्ये करू शकता लाखोंची कमाई
सदर व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी प्रतिसादांचा पाऊस पाडला आहे. एका युजरने चाचांच्या नृत्याला सुपर म्हणून दाद दिली आहे. दुसरा नेटकरी म्हणतोय कि चाचा आता फॉर्ममध्ये आले आहेत. या व्हिडीओला तब्बल १४ मिलियन लोकांनी पाहिले आहे तर व्हिडिओला ७ लाख ३० हजाराहून अधिक लोकांनी पाहिले आहे. सोशल मीडियावर तर चाचांनी जणू कहरच केले आहे. कलेला तसेच आयुष्य दिलखुलास जगण्याला वयाचे बंधन नसावे, असा उत्तम संदेश चाचांनी लोकांना दिला आहे, जो अतिशय लाख मोलाचा आहे.