आजीचा स्वॅगच निराळा! रेकॉर्डड व्हाईसला दिले सणसणीत उत्तर, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ रोज व्हायरल होत असतात. यामध्ये वृद्ध व्यक्तींचे देखील अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. काही व्हिडिओ तर अतिशय मनोरंजक असतात. सध्या असाच एका आजीचा भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये आजींनी कस्टमर केअरच्या रेकॉर्ड मेसेज ला भन्नाट असे उत्तर दिले आहे.
अलीकडे प्रगत तंत्रज्ञानामुळे अनेक अशा वस्तु आहेत, ज्याबद्दल वृद्ध व्यक्तींना माहिती नसते. असेच काहीसे या आजीसोबत घडले आहे. त्यांनी स्मार्ट फोनवरुन कोणाला तरी फोन लावला आहे. मात्र त्या व्यक्तीने फोन न उचल्याने कस्टमर केअरचा एक रेकॉर्डेड मेसेज ऐकायला मिळतो. हा मेसेज म्हणजे आपण ज्या व्यक्तीला कॉल करत आहात तो आता उत्तर देत नाही कृपया थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा. यावर आजीने रागात येऊन सणसणीत असे उत्तर दिले आहे. ती म्हणते की, मग तू का उत्तर देत आहेस. आजीचा उत्तर देण्याचा अंदाज आणि रागीटपणा पाहून लोकांना हसू आले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
Poora customer care dara hua hai😂 pic.twitter.com/KZhaobCJQ2
— Harsh Srivastava (@Harsh_MZP) March 1, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Harsh_MZP या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने आजीचा स्वॅगच भारी असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने आहा आजी एकच नंबर उत्तर दिले असे म्हटले आहे. आणखी एकाने आजीचा नाद खुळा असे म्हटले आहे. तर एकाने आजी खूप क्यूट आहेत असे म्हटले आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या पसंतीस पडला आहे. या व्हिडिओने सोशल मीडियावर हस्याचा पूर आला आहे. हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळालेले नाही.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.