तरुणाला भर रस्त्यात रील बनवणं पडलं महागात; अचानक वृद्धाने मारायला केली सुरुवात, नेमकं घडलं काय? पहा Video (फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट)
सध्या सोशल मीडियाचा जमान्यात प्रसिद्धी मिळवण्यासाठी, लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी वेदवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ लोक बनवत असतात. पण अनेकदा असे व्हिडिओ बनवताना लोकांनी जागेच आणि आपण काय करतोय याचे भान राहत नाही. प्रत्येकाकडे मोबाईल असल्याने त्यामध्ये व्यस्थ राहतात त्यांच्या आसपास काय घडत आहे याचेही भान लोकतांनी नसते. अनेकदा लोक भर रस्त्यात देखील रिल बनवतात. मात्र, काहींना रिल बनवण्याचा नाद आंगलट येतो. अनेकदा यामुळे अनेकजण जीवाला देखील मुकले आहेत. यामुळे जागा पाहून रिल बनवणे आणि आपण काय कंटेन्ट क्रिएट करत आहो हे महत्त्वाचे आहे.
सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका तरुणाला वृद्ध व्यक्तीने मारायला सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरुण भर रस्त्यात आक्षेपार्ह रिल बनवत होता. यामुळे अचानक एका वृद्धाने त्याला दांडक्याने मारायला सुरुवात केली आहे.व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, आजोबा तरुणाला दांडक्याने चोप देत असून तरुण तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून व्हिडिओला लाखो लाईक्स मिळाले आहेत.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक तरुण भर रस्तस्यात रिल बनवत आहे. याच वेळी एका कारमधून आजोबा उतरतात आणि अचानक त्याला दांडक्याने मारायला लागतात. याचवेळी लोकांची गर्दी देखील जमलेली आहे. एक निळ्या साडीतील महिला तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, तरुण रस्त्यावर आक्षेपार्ह रील बनवत होता. यामध्ये तो एका मुलीसोबत रिल बनवत होता, मात्र आजोबांनी वाटले की तो मुलीची छेड काढत आहे. यामुळे त्यांनी त्याला मारायला सुरुवात केली.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
बुजुर्ग नहीं समझते कि यह रील बना रहा है, उन्हें यही लगेगा कि लड़की छेड़ रहा है। अब देखिए अंकल ने गाड़ी से लाठी निकाल कर बना दिया ओरिजनल रील। pic.twitter.com/lalzJ4XisW
— Abhimanyu Singh Journalist (@Abhimanyu1305) March 5, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Abhimanyu1305 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेक युजर्स तरुणाची मजा घेत आहेत. एका युजरने म्हटले आहे की, चांगले झाले असाच मार पडायला पाहिजे. तर दुसऱ्या एकाने रिल बनवत होता आणि खऱ्या आयुष्याची रिल बनली. सध्या हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळालेले नाही.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.