त्वचा होईल लोण्यासारखी मऊसूत! 'हा' पारंपरिक पदार्थ त्वचेसाठी ठरेल वरदान
सर्वच महिलांना डाग विरहित सुंदर आणि मुलायम त्वचा हवी असते. चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी सतत काहींना काही उपाय केले जातात. कधी कोरियन स्किन केअरचा वापर केला जातो तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या प्रॉडक्टचा वापर करून त्वचेची काळजी घेतली जाते. पण तरीसुद्धा त्वचेवर वाढलेले डाग आणि पिंपल्स कमी होत नाही. धूळ, माती, प्रदूषण, आहारात होणारे बदल, जंक फूड किंवा चुकीच्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे त्वचेवर सतत पिंपल्स, मुरूम, वांग किंवा मोठे फोड येण्याची जास्त शक्यता असते. आज आम्ही तुम्हाला त्वचा चमकदार आणि सुंदर मुलायम करण्यासाठी लोण्याचा वापर कसा करावा? लोणी लावल्यामुळे त्वचेला नेमके काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
लोणी लावल्यामुळे त्वचा अतिशय चिकट आणि तेलकट होऊन जाते. त्यामुळे अनेक महिला त्वचेवर लोणी लावणे टाळतात. पण त्वचेवर नैसर्गिक चमक वाढवण्यासाठी लोण्याचा वापर तुम्ही करू शकता. यामध्ये असलेले घटक त्वचा आतून मऊ करण्यासाठी मदत करतात. घरच्या घरी तयार केलेले लोणी त्वचेला खोलवर पोषण देते. यामुळे त्वचा अतिशय मऊ दिसू लागते. लोण्यामध्ये जीवनसत्त्व ‘ए’, ‘डी’, ‘ई’ आणि नैसर्गिक फॅट्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात. याशिवाय कोरडी किंवा निस्तेज झालेली त्वचा पुन्हा उजळदार करण्यासाठी लोण्याचा वापर तुम्ही करू शकता. थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा अधिकच कोरडी आणि निस्तेज होऊन जाते. नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून तुम्ही लोण्याचा वापर करू शकता.
रात्री झोपण्याआधी किंवा दिवसभरात वेळ मिळाल्यानंतर तुम्ही हातांवर थोडस लोणी घेऊन संपूर्ण त्वचेवर हलक्या हाताने मसाज केल्यास त्वचेमधील रक्तभिसरण सुधारण्यास मदत होईल. यामुळे चेहऱ्यावर वाढलेले कोरडेपणा नष्ट होऊन त्वचा अतिशय हायड्रेट दिसू लागेल. वाढत्या वयात चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी लोण्याचा वापर करावा. तुमची त्वचा जर अतिशय कोरडी असेल तर आठवड्यातून दोनदा किंवा तीनदाचा चेहऱ्यावर लोणी लावावे. डोळ्यांभोवती आलेले काळे डाग आणि सूज कमी करण्यासाठी डोळ्यांच्या आजूबाजूला लोणी लावून हलक्या हाताने मसाज करा. पण जर तुम्ही त्वचा अतिशय तेलकट किंवा चिकट असेल तर लोण्याचा वापर करू नये.
लोण्यामध्ये असलेले गुणकारी घटक त्वचा आतून स्वच्छ आणि हायड्रेट ठेवतात. यामध्ये नैसर्गिक फॅट्स, जीवनसत्वे आणि अँण्टी ऑक्सिडंट्स इत्यादी आवश्यक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. सुंदर त्वचेसाठी वेगवेगळ्या स्किन केअर क्रीम वापरण्याऐवजी लोण्याचा वापर करावा. यामुळे त्वचेला मॉइश्चराइझर प्रमाणे पोषण मिळते.