पावसाळा आणि खड्ड्यांचं कनेक्शन खूप घट्ट आहे. अनेकदा या चिखलाच्या पाण्यामुळे कपडे देखील खराब होतात. भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जा प्रत्येक रस्त्यांवर खड्डे हे दिससातच. याच खड्ड्यांना सगळेच वैतागले आहेत. मात्र एका ई रिक्षा चालकाने यावर एक हटके जुगाड शोधला आहे. जो पाहून नेटकरी देखील चकित झाले आहेत. या रिक्षाचालकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे. काय आहे नेमका हा जुगाड चला तर जाणून घेऊयात.
क्या कहता था अमेरिका, अब हम कहते हैं तू क्या है बे 😂🤣🤣
😂 इंडियन जुगाड़ 😂 pic.twitter.com/m873fjUDT4
— Mahima Yadav (@SinghKinngSP) August 13, 2025
पावसाळ्यामुळे खड्डे मोठ्या प्रमाणात होतात आणि त्यामुळे रस्त्याने जाणारी वाहनं आणि माणसांना देखील याचा खूप त्रास होतो. याच त्रासावर एका ई रिक्षाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. खड्ड्यांंमुळे चिखलाचं पाणी साचतं. या पाण्यातून वाट काढत जाणं कठीण होतं म्हणून एका ई रिक्षाला एक स्टॅन्ड आहे आणि त्या स्टॅन्डच्या मदतीने तुम्ही चिखलाच्या पाण्यात पाय न टाकता सगळ रिक्षात बसू शकता.
या व्हायरल व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे चिखलाच्या पाण्याने भरलेला एक रस्ता आहे. तिथे एक पॅसेंजर रिक्षाची वाट पाहत उभा असतो. जशी ही ई-रिक्षा त्या पॅसेंजरसमोर थांबते तेव्हा त्या रिक्षातून एक लोखंडी स्टॅन्ड बाहेर येतं त्या स्टॅन्डच्या मदतीने हा पॅसेंजर चिखलाच्या पाण्यात पाय न टाकता आरामशीर रिक्षात जाऊन बसतो. चिखलाच्या पाण्यापासून आणि खड्यांपासून पॅसेंजरला वाचवण्यासाठी केलेला हा देसी जुगाड सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ नक्की कुठला आहे याची माहिती नाही. मात्र या व्हिडीओने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या व्हिडीओ पसंती देत नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. हा जुगाड आणि हे टॅलेंट भारताच्या बाहेर गेलं नाही पाहिजे असं एका युजरने कमेंटमध्ये म्हटलं आहे. त्याचबरोबर आणखी एका युजरने अशी कमेंट केली की, अमेरीकेने भारताकडून हा असा जुगाड शिकला पाहिजे असं देखील म्हटलं आहे. ई-रिक्षाच्या या व्हिडीओवर नेटकरी चांगलेच फिदा झाले आहेत.