(फोटो सौजन्य: X)
भारताचा शेजारील देश पाकिस्तान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. पाकिस्तानातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आताही इथला असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यातील दृश्ये तुम्हाला आवाक् करतील. जगातील अनेक लोक इस्रायलवर संतापले आहेत. याबाबत अनेक ठिकाणी निषेधही सुरु आहेत. याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. गेल्या काही वर्षांत, सोशल मीडियावर इस्रायली उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड सुरू आहे. आता पाकिस्ताननेही त्यात उडी घेतली आहे, पण या निषेधादरम्यान पाकिस्तानच्या लोकांनी केलेल्या कृतीने सर्वांनाच धक्का बसला आहे. व्हिडिओतील दृश्ये तुम्हालाही अचंबित करतील. यात नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
पाकिस्तानमधून एक व्हिडिओ समोर आला आहे जो पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये काही तरुण आणि सामान्य लोक कॅमेऱ्यासमोर तोंडाने सॅनिटरी पॅड फाडताना दिसत आहेत. आता याचे कारण काय तर… वास्तविक हे पॅड्स इस्रायली कंपन्यांची आहेत आणि त्यांचा वापर करणे म्हणजे इस्रायलला मदत करण्यासारखे आहे अशी अफवा पसरली आहे. व्हिडिओ शेअर करतानाही हाच दावा केला जात आहे. यानंतर झालं असं की, कोणताही विचार न करता, कोणतीही पडताळणी न करता, देशभक्तीची स्पर्धा सुरू झाली आणि लोकांनी इस्रायलच्या द्वेषाने तोंडाने सॅनिटरी पॅड फेडण्यास सुरुवात केली.
KFC 🍗 PEPSI 👞 BATA के बाद अब “सैनिटरी पैड” 🥹
किसी ने पाकिस्तान में ये अफवाह फैला दी कि “सैनिटरी पैड” भी इज़राइली कम्पनी के हैं ,, ज़ालिमों ने मुँह से ही फाड़ दिये।🤦♀️ pic.twitter.com/FYKMS8j02P
— Ocean Jain (@ocjain4) April 17, 2025
या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून लोक हा सर्व प्रकार पाहून आवाक् झाले आहेत आणि पुन्हा पाकिस्तानवर टीका कतृ लागले आहेत. या घटनेचा व्हिडिओ @ocjain4 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘पाकिस्तानमध्ये कोणीतरी अफवा पसरवली की सॅनिटरी पॅड देखील इस्रायली कंपनीचे आहेत. क्रूर लोकांनी त्यांना तोंडाने फाडले’ असे लिहिले आहे. अनेक युजरने यावर कमेंट्स करत व्हिडिओवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “हे सर्व पाकिस्तानी अज्ञानी आहेत, त्यांना काय करावे आणि काय करू नये याबद्दल काहीही समजत नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हा अज्ञानी लोकांचा समूह आहे, ते अज्ञानाने भरलेले आहेत”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही