(फोटो सौजन्य: Instagram)
गणेशोत्सवाचा सणानिमित्त सोशल मीडियावर आता गणपतीचे, त्याच्या देखाव्याचे आणि गणेश मंदिरांचे अनेक व्हिडिओज व्हायरल होत आहेत. अशातच बीडमधील एका मंदिराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मंदिरातील धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा लोकांना आश्चर्य करत आहे. येथे असलेल्या गणपती मंदिराची एक अनोखी परंपरा गेल्या १०० वर्षांपासून चालत आली आहे. या मंदिरात प्रसाद वाटण्याची पद्धत इतर ठिकाणांपेक्षा फार वेगळे आहे. येथे पूजा केल्यानंतर प्रसाद भाविकांच्या हातात दिला जात नाही, तर मंदिराच्या छतावरून खाली फेकला जातो.
काय आहे ही परंपरा
व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात दिसते की, मंदिराच्या छतावरून प्रसादाला फेकले जात आहे आणि खाली भाविकांची गर्दी छत्री उलटी पकडून याला प्रसादाला आपल्या छत्रीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. हे दृश्य पाहण्यासाठी लोक दूरवरून येतात. गौरी पूजनाच्या वेळी ही परंपरा विशेषतः दिसून येते. या निमित्ताने मोठ्या प्रमाणात प्रसाद तयार केला जातो आणि नंतर छतावरून तो भाविकांमध्ये वाटला जातो. स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे की ही परंपरा केवळ भक्ती आणि श्रद्धेचे प्रतीक नाही तर परस्पर बंधुता आणि आनंदाचा संदेश देते. जेव्हा प्रसाद छतावरून खाली येतो तेव्हा सर्वांना तो समान प्रमाणात मिळतो. कोणाकडे मोठे भांडे असो किंवा छत्री, प्रसाद मिळाल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसतो.
ही परंपरा १०० वर्षांपूर्वी सुरू झाली होती
गावातील वडीलधारी लोकांचा असा विश्वास आहे की, ही परंपरा मागील १०० वर्षांपासून सुरु आहे आणि आजतागात तिला कोणी मोडू शकलं नाही. पूर्वी मंदिरात प्रसाद मोठ्या प्रमाणात तयार केला जात असे आणि तो लवकर वाटणे कठीण होते. तेव्हापासून छतावरून प्रसाद टाकण्याची परंपरा सुरू झाली, जी हळूहळू लोकांमध्ये लोकप्रिय झाली आणि आता ती धार्मिक उत्सवाचा एक महत्त्वाचा भाग बनली आहे.
#Watch | बीड जिले के भगवान गणपति मंदिर की अनोखी परंपरा, जहां पूजा के बाद प्रसाद को मंदिर की छत से फेंका जाता है और श्रद्धालु उसे उल्टा छाता पकड़कर लपकते हैं।
Unique tradition at Bhagwan Ganpati Temple in Beed district where after worship, the prasadam is thrown from the temple… pic.twitter.com/ZB5zBkIOPo
— Asian News Bharat (@Asian_newsBH) September 3, 2025
आजच्या काळातही जेव्हा आधुनिक पद्धतींचा अवलंब केला जात आहे, तेव्हा बीडचे हे मंदिर त्याच्या अनोख्या परंपरेसाठी ओळखले जाते. येथे येणाऱ्या भाविकांना केवळ गणपतीचे दर्शनच मिळत नाही, तर प्रसाद वाटपाची ही खास परंपरा देखील पाहता आणि अनुभवता येते. ही परंपरा मंदिराची ओळख बनली आहे आणि येणाऱ्या पिढ्याही ती जपण्याचे वचन देतात.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.