कितीही प्रेम (Love) असले तरी जोडप्यांमध्ये भांडणे होणे सामान्य गोष्ट आहे, परंतु अनेकदा भांडणे होतात. भांडण काही काळानंतर मिटले तरी काही जोडप्यांमध्ये थोड्यावेळाने पुन्हा जोरदार भांडण होते. अशाच एका भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Social media viral video) होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये (wife beat husband at railway station) रेल्वे स्थानकावर एका जोडप्यामध्ये भांडण होताना दिसत आहे. या भांडणा दरम्यान, बायकोनं नवऱ्याला चांगलच धुतलं आहे. हा व्हिडीओ पाहणारे सोशल मीडिया युजर्स कमेंट करत आहेत की, अशी भांडण यापूर्वी कधीच पाहिली नसेल.
[read_also content=”‘रात्री बेड शेअर करू शकत नाही’, अब्जाधीशाने सांगितलं सिंगल राहण्याचं कारण, तरुण दिसण्यासाठी केलाय कोट्यवधीचा खर्च! https://www.navarashtra.com/viral/i-cant-share-bed-billionaire-bryan-johnson-revealed-reason-for-being-single-nrps-445396.html”]
व्हिडीओमध्ये एक जोडपे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर ट्रेनची वाट पाहत असल्याचे दिसत आहे. इतक्यात ट्रेन थांबते पण यावेळी काय झाले की पत्नीला अचानक राग येतो. तिच्या देहबोलीवरून असे दिसते की ती तिच्या पतीवर आधीपासूनच रागावलेली होती.
काही वेळातच दोघांमध्ये भांडण सुरू होतं. यावेळी पत्नीने पतीच्या डोक्यावर हाताने वार करत असल्याचं व्हिडिओत दिसत आहे. या धक्क्यातून तो सावरण्याचा प्रयत्न करतो मात्र त्यापुर्वी पत्नीने त्याचे पाय धरून त्याला उचलते आणि प्लॅटफॉर्मवरच आदळते. ती न थांबता त्याच्या वर बसते आणि त्याला चापट मारत राहते.
या मारहाणीत पती तिच्यापासून पळून जाण्याचा प्रयत्न करतो, परंतु पत्नी त्याला मारहाण करणे सुरूच ठेवते. दोघेही बराच वेळ भांडतात आणि पत्नीने त्याला बेदम मारहाण करते. या घटनेने उपस्थित सर्वजण स्तब्ध होतात पण कोणीही मध्यस्ती करण्याचा प्रयत्न करत नाही. काही लोकांनी या मारहाणीचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडिओवर नेटकरी आता फार मजेशीर कंमेट करताना दिसत आहेत.