(फोटो सौजन्य: Instagram)
सोशल मिडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. लोक स्वत:ला व्हायरल करण्यासाठी इथे अनेक नवनवीन प्रकार करु पाहतात. कधी हे प्रकार यशस्वी होतात तर कधी असे करताना लोक तोंडावर आपटतात. आजकाल तर लोक प्रसिद्धीसाठी काहीही करायला बघतात. आपला जीव धोक्यात घालून लोक सोशल मिडियावर विचित्र प्रकार करतात. अशा घटनांचे अनेक व्हिडिओज आजवर सोशल मिडियावर शेअर करण्यात आले आहेत. आताही इथे असाच एका व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात एक स्टंट करणं महिलेच्या चांगलचं अंगलड आले. नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
नुकताच व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, यात एक महिला चक्क घराच्या छतावर चढून डान्स करताना दिसून येते. व्हिडिओत पाहूनच घराचे छत फारसे मजबूत नसल्याचे समजते. मात्र तरीही फक्त स्वत:ला व्हायरल करण्यासाठी ही महिला धोका पत्कारते आणि पत्र्याच्या या छतावर नाचू लागते. पण तिचा हा आनंद फार काळ टिकत नाही आणि हा जीवघेणा स्टंट तिला चांगलाच महागात पडतो.
व्हिडिओत आपण पाहू शकता, यात महिला नाचता नाचता अचानक छतावरुन खाली उतरण्याचा प्रयत्न करताना दिसते मात्र याचवेळी तिची साडी छताच्या पत्र्याला अडकते आणि ती थेट जमिनीवर आपटली जाते. महिला यात इतक्या जोरदार खाली पडते की नक्कीच तिला यात गंभीर दुखापत झाली असावी. हा व्हिडिओ आता नक्की कुठला आणि कधीचा आहे याची अधिकृत माहिती मिळाली नाही. मात्र सोशल मीडियावर आता ही घटना चांगलीच धुमाकूळ माजवत आहे. लोक यातील दृश्ये पाहून आवाक् झाली आहेत तर काही महिलेसोबत जे घडले ते त्याबाबत हळहळ व्यक्त करत आहेत.
या घटनेचा व्हायरल व्हिडिओ हा @lalankanchan31 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 4 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले आहे तर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रीया व्यक्य केल्या आहेत. एका यूजरने लिहिल आहे, ” मोठ्या दुःखासह मला हसावं लागलं” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अति आत्मविश्वास” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “कंबर तुटली असेल”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.