(फोटो सौजन्य – X)
दिल्लीतील गजबजलेल्या सरोजिनी नगर मार्केटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये महिला आपापसात भांडताना दिसत आहेत. कुठेही जा महिलांची हाणामारी काही आपल्यापासून लपून राहिली नाही अशात असाच एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे ज्यात दोन महिला एका ड्रेसवरून भांडताना दिसून आल्या. बाजारपेठेतील हे दृश्य पुढे अनोखेच वळण घेते जे पाहण्यासाठी सर्वजण जमा होतात. दोन्ही महिला एकमेकांना असा चोप देतात की पाहून तुमच्यासाठी अंगावर काटा येईल. नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे व्हिडिओत?
कथितपणे हे नाटक एका ड्रेसवरून सुरू झाले. एका युजर्सने पोस्ट केलेल्या क्लिपमध्ये, एक महिला दुसऱ्या महिलेला जोरात थप्पड मारते, ज्यामुळे लाथा मारणे, मुक्का मारणे, ओरडणे आणि केस ओढणे असे प्रकार सुरू होतात. हे सर्व दिवसाढवळ्या, गर्दीच्या बाजारपेठेत घडून आलं. आश्चर्यचकित झालेल्या लोकांनी मजा घेत घेत हे दृश्य आपल्या डोळ्यात टिपलं तर काहींनी ते आपल्या कॅमेरात कैद केलं. व्हिडिओमध्ये, कोणीतरी असे म्हणताना ऐकू येते की, ‘त्या महिला आहेत, कृपया त्यांना जाऊ द्या.’ दोन्ही महिलांपैकी कोणीही मागे हटण्यास तयार नव्हती. काही प्रेक्षक सावधगिरीने त्यांना वेगळे करण्यासाठी आत आले तरीही हाणामारी काही थांबली नाही, उलटून ती पुढे आणखीनच वाढली.
#दिल्ली की मशहूर सरोजिनी नगर मार्केट से जुड़ा एक वीडियो सोशल मीडिया पर तेजी से #वायरल हो रहा है, जिसमें दो महिलाओं के बीच एक ही कपड़ा खरीदने को लेकर जबरदस्त कहासुनी और झगड़ा होता नजर आ रहा है। बताया जा रहा है कि दोनों महिलाएं एक ही कपड़े को खरीदना चाहती थीं, जिसके बाद बहस इतनी… pic.twitter.com/giQHMOOCaZ
— UttarPradesh.ORG News (@WeUttarPradesh) April 9, 2025
सोशल मीडियावर हा व्हिडिओ @WeUttarPradesh नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेविषयीची माहिती देण्यात अली आहे. व्हिडिओ व्हायरल होताच यावर लोकांच्या प्रतिक्रियांचा ओघ सुरू झाला. काहींना हसू आवरता आले नाही, ते विनोद करत होते की ‘फक्त सरोजिनीमध्येच फॅशनचे रूपांतर भांडणात होऊ शकते.’ काही जणांना जास्त काळजी होती, त्यांना आश्चर्य वाटत होते की लोक काहीशे रुपयांसाठी सार्वजनिक ठिकाणी कोणत्या मर्यादेपर्यंत जाऊ शकतात.’
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.