(फोटो सौजन्य – X)
सोशल मीडियावर नेहमीच प्राण्यांच्या जीवनाशी निगडीत काही ना काही शेअर केलं जातं. प्राण्यांमधील लढत यातील विशेष बाब… तुम्ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असाल तर प्राण्यांच्या लढतीचे अनेक व्हिडिओज तुम्ही आजवर इथे पाहिले असतील मात्र सध्या जंगलातील एक हृदयद्रावक व्हिडिओ इथे व्हायरल झाला आहे, ज्यातील दृश्ये तुमचे अश्रू अनावर करतील.
सध्या सोशल मीडियावर पसरलेला हा व्हिडिओ तुम्ही याआधी क्वचितच कुठे पाहिला असावा. हा व्हिडिओ एका सिंहिणीबद्दल आहे जी जंगलात शिकार करण्यासाठी गेली होती, पण काही प्राण्याने तिच्या बाळाला मारले. फ्रेममध्ये पुढे काय होते ते पाहण्यासारखे आहे. याचा व्हिडिओ वादळासारखा इंटरनेटवर पसरत आहे. लोक यातील दृश्ये पाहून हादरली आहेत तर काही भावुक झाली आहेत.
इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की जंगलातील सर्वात धोकादायक शिकारींपैकी एक असलेली सिंहीण शिकार करून परतल्याचे दिसते. मात्र काही क्षण पुढे जाताच तिला आपले बाळ जमिनीवर पडल्याचे दिसते. दुरूनच हे दृश्य पाहताच सिंहीण हवेच्या वेगाने त्याच्या दिशेने पळू लागते. आपल्या पिल्लाला पाहताच ती अस्वस्थ होते, यावेळी तिच्या चेहऱ्यावर आपल्या पिल्लासाठीची काळजी स्पष्ट दिसून येते. तिने बराच वेळ तिच्या मुलाला उठवण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा त्याने प्रतिसाद देत नाही. यानंतर आक्रमक होते आणि जोरजोरात जंगलात आक्रोश करू लागते.
तथापि, या सगळ्यामध्ये, व्हिडिओमध्ये एक सुंदर क्षण देखील पाहायला मिळाला. खरं तर, जेव्हा सिंहीण तिच्या बाळाच्या मृत्यूबद्दल शोक करत होती, तेव्हा जिराफची एक जोडी थोड्या अंतरावर उभी राहून सर्वकाही पाहत होती. जणू काही त्यालाही सिंहिणीच्या वेदनेचे दुःख झाले आहे. हा व्हिडिओ @alicemurrellanimals नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडिओला ‘आईचे दुःख’ असे कॅप्शन देण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेक युजर्सने आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “बाळ गेल्यावर आईला खूप दुःख होतं” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “खूप दुःखद”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.