(फोटो सौजन्य – Instagram)
इंटरनेटवरील सोशल मीडियाचे जग आश्चर्यकारक गोष्टींनी भरलेले आहे. हे असे प्लॅटफॉर्म आहे जिथे तुमच्या डोळ्यासमोर काय येईल आणि कधी येईल हे सांगणे कठीण आहे. तथापि, कधीकधी येथे अशा गोष्टी पाहायला मिळतात की त्यावर विश्वास ठेवणे कठीण होते. असाच एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. हा व्हिडिओ एका सापाशी संबंधित आहे. व्हिडिओतील दृश्ये फार अनोखे आहेत, जे तुम्हाला आश्चर्याचा धक्का देऊ शकतात. आता यात नाक्की काय आहे ते चला सविस्तर जाणून घेऊया.
सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये सापांच एक जोडपं रस्त्यावर प्रेम व्यक्त करताना दिसून येत आहेत मात्र तितक्यात तिथे एका तिसऱ्या सापाची एंट्री होते आणि इथूनच खरा खेळ सुरु होतो. तीन तिगडा काम बिगडा ही म्हण तर तुम्ही ऐकलीच असेल मात्र यात सापांच्या या सीनमध्ये पुढे काय घडले ते पाहणे मजेदार ठरेल. फ्रेममध्ये पुढे जे काही दिसले त्यावर विश्वास ठेवणे कठीण होईल. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर लोक चांगलाच व्हायरल होत आहे.
अवघ्या काही सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये, साप आणि मादी साप रस्त्याच्या मधोमध एकमेकांवर प्रेम करताना दिसत आहेत. दोघेही एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत. यामध्ये, कधीकधी साप आपले शरीर हवेत उचलतो आणि मादी साप देखील तेच करते. हे दृश्य खूप मनमोहक दिसते आणि तितक्यात तिथे तिसरा साप येतो. फ्रेममध्ये पुढे काय घडले ते पाहण्यासारखे आहे. खरं तर, त्या दोघांना प्रेमात पडलेले पाहून, साप देखील त्यांना मिठी मारण्याचा प्रयत्न करतो. कधीकधी ते तिघेही एकमेकांना मिठी मारतात, तर कधीकधी ते रस्त्यावर त्यांचा फणा पसरून उभे राहतात. कधीही न पाहिलेले हे दृश्य आता लोक मोठ्या प्रमाणावर शेअर करत आहेत.
सापांचा हा व्हायरल व्हिडिओ @maboobjana नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले असून अनेकांनी कमेंट्समध्ये यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ब्रह्मा विष्णु महेश हर हर महादेव” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “दोघात तिसरा आला आता नातं संपणार”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.