(फोटो सौजन्य: Instagram)
सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे नेहमीच अनेक वेगवेगळ्या गोष्टी शेअर केल्या जातात. यातील दृश्य नेहमीच आपल्या मनोरंजनाचे काम करतात आणि म्हणूनच फार कमी वेळेत हे रिल्स सोशल मीडियावर व्हायरल होतात. आताही एक असाच रंजक आणि अनोखा व्हिडिओ इंटनेटवर व्हायरल झाला आहे ज्यात दोन उंदीर भररस्त्यात चक्क WWE करताना दिसून आली आहेत. चिमुकल्या उंदरांची ही फाईट सर्वांचेच लक्ष वेधत असून यात दोघेही एकमेकांचा एकमेकांना जमीनदोस्त करताना दिसून येत आहे. आकाराने लहान असलेली ही उंदीर एकमेकांना इतकी जबरदस्त लढत देतात की रस्त्यावरील सर्व लोक वाटेतच थांबून त्यांच्या या लढतीची मजा लुटू लागतात. चला यात काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
गजराजाला छेडणं व्यक्तीला चांगलंच महागात पडलं, धावत पळत आला अन् पायदळीच तुडवला जीव; थरारक Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात एक दोन चिमुकली उंदीरं एकमेकांना धरून जबरदस्त लढत देताना दिसून येत आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती त्यांना अरे सोड, अरे सोड असं म्हणत ही लढाई थांबवण्याची विनवणी करताना दिसतो पण दोन्ही उंदीरं काही त्याच ऐकत नाही आणि आपली लढाई सुरु ठेवत दोघेही एकमेकांना जमिनीवर आपटतात. त्यांच्यातील हे जबरदस्त युद्ध आता रस्त्यावरील लोकांचेच काय तर युजर्सचेही चांगलेच लक्ष वेधत असून लोक आता त्यांची लढाई कोणत्या कारणामुळे झाली असेल याचा मिश्किल अंदाज लावत आहे. कुणी म्हणत आहे की, गर्लफ्रेंडवरून ते दोघेही भांडत असतील तर कुणी म्हणत आहे की त्यांची खानदानी दुश्मनी आहे म्हणून ते भांडत असतील. दोन्ही उंदरांनी एकमेकांना इतक्या वाईटरित्या धोबीपछाड केला की पाहून सर्वांनाच वाटू लागलं कि मॅटर जरा सिरीयस आहे. आता कारण काहीही असलं तरी उंदरांची ही फाईट मात्र सर्वांच्या आवडीची बनली हे मुख्य… लोकांनी व्हिडिओला लाइक आणि शेअर करत यावर आपली पसंती दर्शवली.
उंदरांच्या या मजेदार आणि लक्षवेधी फाईटचा व्हिडिओ @raja_pehlwan_ नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “नर प्राण्यांची अवस्थाही पुरुषांसारखी आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “भावा, ही एक ही समस्या सगळीकडे आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “महिला पॉवर”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.