(फोटो सौजन्य: X)
सोशल मीडियावर सध्या एका धक्कादायक आणि भीषण घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यातील दृश्ये इतकी थरारक आहेत की ती पाहून तुम्हाला तुमचा राग अनावर होईल. मारहाणीचे व्हिडिओ याआधीही सोशल मीडियावर शेअर झाले आहेत मात्र आता जो व्हिडिओ इथे शेअर झाला आहे त्यातील दृश्ये पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. जसजसा काळ पूढे जात आहे लोक अधिकाधिक भयानक आणि राक्षसी वृत्तीचे बनत चालले आहेत, याचीच प्रचिती आता तुम्हाला या व्हायरल व्हिडिओय पाहायला मिळणार आहे.
बुलंदशहरच्या अनुपशहरमध्ये काही गुंडांनी एका कुटुंबावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर शेअर केला गेला आहे ज्यात काही लोक दुसऱ्या मजल्यावरच्या छतावर तरुणाला लटकवत बेदम मारहाण करताना दिसून आला. ही घटना उत्तर प्रदेशमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हायरल व्हिडिओत जर आपण पाहिले तर यात दिसते की, एक व्यक्ती बिल्डिंगच्या छतावर लटकलेला आहे आणि छतावर उभे असलेले काही लोक त्याला मारहाण करत आहेत. हे संपूर्णच दृश्य फार भयाण आणि माणुसकीला काळिमा फासणारे आहे.
गुंडागर्दी की पराकाष्ठा…
यूपी : जिला बुलंदशहर में अजय–विजय ने मुकेश को पीटते हुए छत से नीचे लटका दिया। अनूपशहर कोतवाली पुलिस ने FIR दर्ज की।⚠️Trigger Warning: Sensitive Media⚠️ pic.twitter.com/C7LDYVCkay
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) March 18, 2025
माहितीनुसार, आता आरोपींविरुद्ध पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी याचा तपास सुरु केला आहे. पीडितांच्या कुटुंबामध्ये मात्र या घटनेमुळे आता भितिचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेचा व्हिडिओ @SachinGuptaUP नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘गुंडगिरीची पराकाष्ठा… बुलंदशहर जिल्ह्यात अजय-विजयने मुकेशला मारहाण करून छताला लटकवले. अनुपशहर कोतवाली पोलिसांनी एफआयआर नोंदवला’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले असून अनेकांनी कमेंट्समध्ये घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “हिंसक खूप जास्त झाले आहेत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “युपीमध्ये काहीही घडू शकते”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.