(फोटो सौजन्य: X)
विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात मागील काळापासून अनेक धक्कादायक घटना घडून आल्या आहेत. आताही इथे अशीच एक घटना व्हायरल झाली आहे ज्याचे सीसीटीव्ही फुटेज आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. पुण्यात मागील काही काळापासून कोयता गॅंगची दहशत वेगाने पसरत आहे. कोयता गॅंगच्या वाढत्या दहशतींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहेत. आता यासंबंधीचाच व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाला आहे ज्यात एका टोळीने एका घरावर कोयता घेऊन हल्ला केल्याचे दिसून आले. घटनेत पुढे काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया.
पुण्यातील एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाला आहे ज्यातील दृश्ये पाहून आता लोकांचा थरकाप उडाला आहे. सदर व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, यात एका बिल्डिंगमधील घराबाहेर काही लोक उभे असल्याचे दृश्य दिसते. या व्हिडिओमध्ये एकूण चार तरुण दिसून येत आहेत. यामध्ये एकाने आपल्या हातात कोयता घेतला आहे तर एक घराची बेल वाजवत आहे. यावेळी व्यक्तीने आपल्या हातात कोयता घेऊन तो पाठीमागे गुपचूप लपवलेला असतो. सर्वांनी मिळून घर लुटण्याचाच प्लॅन केला असावा मात्र सुदैवाने कोणीही दार उघडला नाही. शेवटी ते लोक वैतागून तेथून निघून गेले.
‘कोयता गँग’ अशी कुठलीही गँग पुण्यात नाही असा दावा पुणे पोलिसांकडून केला जातो. परंतु 20-22 वर्षाची मुलं भररस्त्यात कोयत्याने वार करून खून करतात, कोयते हातात घेऊन दहशत माजवतात, घरी जाऊन धमक्या देतात, हा वाढत जाणारा
ट्रेंड शहरासाठी घातक आहे. @PuneCityPolice @Dev_Fadnavis pic.twitter.com/KzkEiYUzWU— Archana More-Patil (@Archana_Mirror) March 17, 2025
संपूर्ण नाग समाज घाबरलेला आहे… ! काकूंचे हे वर्तन पाहून तुमचाही थरकाप उडेल; Viral Video
ही संपूर्ण घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून आता याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेचा व्हिडिओ @Archana_Mirror नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ”कोयता गँग’ अशी कुठलीही गँग पुण्यात नाही असा दावा पुणे पोलिसांकडून केला जातो. परंतु 20-22 वर्षाची मुलं भररस्त्यात कोयत्याने वार करून खून करतात, कोयते हातात घेऊन दहशत माजवतात, घरी जाऊन धमक्या देतात, हा वाढत जाणारा ट्रेंड शहरासाठी घातक आहे’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिले आहे, “पुणे पोलिस कुठे बिझी आहेत?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “लोकांना आता स्वतःची सुरक्षा स्वताः करायची आहे कारण पोलीसच या गुंडांना घाबरतात”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.