Typhoon Bualoi : टायफून बुआलोईचा व्हिएतनामला तडाखा; पूरामुळे १० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Typhoon Bualoi update in marathi : हनोई : व्हिएतनामध्ये बुआलोई वादळाने हाहा:कार माजवला आहे. रविवारी (२८ सप्टेंबर) हे वादळ व्हिएतनामच्या वायव्येकडे सरत असून ते क्वांग ट्राय आणि न्घे अन प्रांतात धडकले. यामुळे मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला आहे. देशात मुसळधार पाऊस सुरु आहे. जोरदार वारे वाहत आहेत. अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. अनेक घरांची छते उडून गेली आहेत. यामुळे पुराच्या पाण्यात बुडून १२ लोकांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात आहे.
पण बुआलोईने व्हिएतनामच्या अनेक प्रांतांमध्ये मोठ्या प्रमाणात विनाश घडवून आणला आहे. घरे, शाळा, पूल पाण्याखाली गेले आहेत. वीजपुरवठाही खंडित झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, व्हिएतनामध्ये थान होआ प्रांतात एका अधिकाऱ्याचा वादळी वाऱ्यामुळे अंगवार झाड पडल्याने मृत्यू झाला आहे. वाऱ्याचा वेग कमी जास्त होत असून हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वादळ लाओच्या दिशने सरकत आहे.
ह्यू शहरातही एका व्यक्तीचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. शिवाय समुद्रकिनारी वादळाचा धोका जास्त असल्याने सरकारने बोटींना समुद्रात जाण्यास मनाई केली होती. यामुळे मच्छिमारांनी कामकाज बंद केले होते. पण वादळाचा वेग इतका होता की, यामुळे समुद्रकिनाऱ्यावरील बोटींचे साखळदंड तुटले ज्यामुळे नऊ क्रू मेंबर्सचा वाहून मृत्यू झाला. सध्या आठ मच्छिमार बेपत्ता असून त्यांचा शोध घेणे सुरु आहे.
हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (२६ सप्टेंबर) या बुआलोई वादळाने फिलिपाइन्समध्ये कहर केला होता. यामध्ये फिलिपाइन्समधील २० जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. यामुळे २३ हजारांहून अधिक कुटुंबांना फटका बसला आहे. देशात विजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. सध्या वाऱ्याचा वेग ताशी १३३ किलोमीटर असून वादळ लाओसाच्या दिशेने सरकत आहे. यामुळे लाओसमध्येही हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम सुरु आहेत. सध्या व्हिएतनामध्ये वादळामुळे मुसळधार पावासाचा कहर सुरुच आहे.
प्रश्न १. बुआलोई वादळामुळे व्हिएतनामध्ये का परिस्थिती आहे?
सध्या व्हिएतनामध्ये बुआलोई वादळाने प्रचंड विध्वंस माजवला असून मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक घरे, रस्ते, शाळा, पूल पाण्याखाली गेले आहे.
प्रश्न २. व्हिएतनाममध्ये बुआलोईमुळे किती जीवितहानी झाली?
व्हिएतनाममध्ये बुआलोई वादळामुळे १२ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ११ जण पूराच्या पाण्यात बुडून मरल पावले आहेत, तर एकाच्या वाऱ्यामुळे झाड अंगावर पडून मृत्यू झाला आहे.
प्रश्न ३. सध्या बुआलोई वादळ कुठे आणि किती वेगाने सरकत आहे?
राष्ट्रीय हवामान विभागेन दिलेल्या माहितीनुसार, ताशी १३३ किलोमीटर वेगाने लाओसच्या दिशेने सरकत आहे.
Typhoon Bualoi: व्हिएतनामवर घोंगावतेय वादळी संकट; बुआलोई टायफूनमुळे देशातील हजारो लोकांचे स्थलांतर