धक्कादायक! विमानाच्या चाकात लपून भारतात पोहोचला १३ वर्षांचा अफगाणी मुलगा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Afghanistan News in Marathi : काबूल : एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अफगाणिस्तानमधील (Afghanistan) एक अल्पवयीन मुलाने विमानाच्या चाकात बसून भारतात प्रवेश केला आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २१ सप्टेंबर २०२५ रोजी ही घटना घडली आहे. एक १३ वर्षांचा अफगाणी मुलगा विमानच्या मागील लॅंडिग गियरमध्ये बसून भारतात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानच्या KAAM एअरलाइन्सच्या विमान RQ-4401 मध्ये ही घटना घडली. भारतीयवेळनुसार रविवारी सकाळी ८.४६ वाजता हे विमान काबूलवरुन दिल्लीला रवाना झाले होते. यावेळी हा मुलगा विमानाच्या मागील लॅंडिग गियरमध्ये लपून बसला. हे विमान दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमातळावर टर्मिनल ३ वर हे विमान १०.२० ला पोहोचले होते. विमानाचे लॅंडिग झाल्यानंतर प्रवासी उतरत असताना कर्मचाऱ्यांना एक मुलगा विमानाच्या चाकाजवळ फिरताना दिसला.
कर्मचाऱ्यांनी तातडीने त्या मुलाला ताब्यात घेतले आणि अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. मुलाला CISF च्या ताब्यात देण्यात आले आणि नंतर पोलिसांकडे स्वाधीन करण्यात आले. यावेळी चौकशीदरम्यान मुलाने उत्सुकतेपोटी हे कृत्य केले असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. मुलाने म्हटले की, त्याला विमानातून प्रवास करायचा होता यामुळे त्याने हा मार्ग निवडला. सध्या मुलाला परत अफगाणिस्तानला सुरक्षित पाठवण्यात आले आहे. हा मुलगा अफगाणिस्तानच्या कुंडुझ येथील रहिवासी आहे.
सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानची देखील तपासणी करण्यात आली आहे. विमान सुरक्षित आहे. त्याच दिवशी (२१ सप्टेंबर) या अफगाण मुलाला परत पाठवण्यात आले आहे. मात्र या घटनेने भारतासह अफगणास्तानही हादरले आहे. तसेच सर्व सुरक्षा अधिकाऱ्यांना धक्का बसला आहे. सुरक्षा तज्ज्ञांच्या मते, विमानाच्या चाकाजवळ बसून प्रवास करणे अत्यंत धोकादायक आहे. विमान जवळपास ३० हजार फूट उंचीवर होते.
यावेळी तापमान ४० ते ६० अंश सेल्सिअस पर्यंत असते, ज्यामुळे ऑक्सिजनची पातळी अत्यंत कमी असते. अशा वेळी व्यक्तीच्या मृत्यूचाही मोठा धोका असतो. शिवाय लॅंडिग गियर कंपार्टमेंट विमानाच्या सर्वात खालच्या बाजूला असते. या ठिकाणी ब्रेक सिस्टम, हायड्रॉलिक पाईप, आणि सुरक्षा उपकरम असतात. या ठिकाणी ऑक्सिजन अत्यंत कमी असतो. यामुळे कोणच्याही जगण्याचे चान्स नसतात.
२०२१ मध्ये देखील अशी एक घटना घडली होती. यावेळी तालिबान सरकारने अफगाणिस्तानमध्ये सत्ता काबीज केली होती. यावेळी अनेक लोकांनी देश सोडण्यासाठी धाव घेतली. मारले जाण्याच्या भीतीने लोक धोकादायक मार्गावरुनही बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी अनेक नागरिकांनी विमानाला लटकून देश सोडला होता. पण यामुळे अनेकांचा खाली पडून मृत्यू झाला होता.
जॉर्जिया मेलोनींचेही सरकार कोसळणार? इटलीच्या रस्त्यांवर हिंसक निदर्शने सुरु, नेमकं कारण काय?