तुर्कस्थान (Turkey Earthquake) आणि सीरियात (Syria Earthquake) या दशकातील सर्वात मोठा भूकंप झाला आहे. तीन भूकंप एकापाठोपाठ एक झाल्यानं सगळंच उद्ध्वस्त झालंय. आताा भूकंपग्रस्त तुर्कस्तान आणि सीरियामध्ये, हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश शांत झाला आहे. तुर्कस्थान आणि सीरियात भुकंपामुळे झालेल्या मृतांची संख्या 24,000 वर पोहोचली आहे. तर, भूकंपाच्या 100 तासांनंतर, ढिगाऱ्यातून लोक जिवंत सापडण्याची आशा संपुष्टात आली आहे.
[read_also content=”पिंपरीतील उमेदवार कोट्याधीश! मविआच्या उमेदवाराकडे ६ लाखांची बंदूक; पोटनिवडणुकीत पैसाच पैसा https://www.navarashtra.com/maharashtra/millionaire-candidate-in-pimpri-6-lakhs-gun-in-maviya-candidates-possession-money-is-money-in-by-elections-nrdm-368900.html”]
या नैसर्गिक आपत्तीतील मृतांची संख्या 24,000 वर पोहोचली आहे. तुर्कीमध्ये 19,000 हून अधिक लोक मारले गेले आहेत, तर सीरियामध्ये 3,000 हून अधिक लोक मारले गेले आहेत. भूकंपग्रस्त तुर्की आणि सीरियासाठी जागतिक बँकेने 1.78 अब्ज डॉलर्सची मदत मंजूर केली आहे. ही रक्कम बचाव-मदत कार्ये आणि पुनर्बांधणीसाठी खर्च केली जाईल.
पाऊस आणि बर्फवृष्टी दरम्यान संथ गतीने सुरू असलेल्या बचाव कार्यात, एक किशोर देखील सापडला जो ढिगाऱ्यांमधून लघवी पिऊन वाचला, त्याला बचाव पथकाने बाहेर काढले आणि रुग्णालयात पाठवले. किशोर अदनान मुहम्मद कोर्कुट हा भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या गझियानटेप शहराजवळ सापडला. जवळपास राहणाऱ्या सुमारे 15 दशलक्ष लोकसंख्येला भूकंपाचा सर्वाधिक फटका बसला आहे. येथील क्वचितच एकही घर किंवा मोठी इमारत नुकसानीपासून वाचली आहे. चार दिवसांपासून बचावकार्य सुरू असूनही अद्याप बरेच काम बाकी आहे.
दरम्यान, जगभरातील देशांतील मदत आणि बचाव पथके भुंकपग्रस्त भागात पोहोचत आहेत. ज्या देशांनी प्रथम मदत पाठवली त्यात भारताचा समावेश आहे. भारताने मदतीसाठी ‘ऑपरेशन दोस्त’ मोहीम सुरू केली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारतीय संघ जीव आणि मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी आपले सर्वोत्तम प्रयत्न करत राहतील.
अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ऑपरेशन दोस्त’ अंतर्गत भारताने भूकंपग्रस्त तुर्कस्तान आणि सीरियामध्ये 841 कार्टन्स औषधे आणि संरक्षणात्मक उपकरणे पाठवण्यात आली आहेत. तसेच, भारताने तुर्कस्तान आणि सीरियाला 6.1 टन वजनाची औषधी, सुरक्षा संरक्षण उपकरणे आणि निदानाची 841 कार्टन पाठवली आहेत.