तुर्कस्थान (Turkey Earthquake) आणि सीरियात (Syria Earthquake) या दशकातील सर्वात मोठा भूकंप झाला आहे. तीन भूकंप एकापाठोपाठ एक झाल्यानं सगळंच उद्ध्वस्त झालंय. आताा भूकंपग्रस्त तुर्कस्तान आणि सीरियामध्ये, हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश शांत झाला आहे. मात्र, तुर्कस्थानमधुन एक अशी बातमी समोर आली आहे ज्यामुळे तुम्हाला संताप येईल. या भुकंपाने मानसं तर हिरावली पण काही मानसांमधील माणुसकीही आता शिल्लक राहिली नसल्याच दिसत आहे. तुर्कस्तानमध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपानंतर तिथे लूटमारीच्या घटना घडल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी तब्बल ४८ जणांना अटक करण्यात आली आहे. तुर्कीच्या अधिकृत मीडिया एजन्सीने ही माहिती दिली आहे.
[read_also content=”पुण्यात दुहेरी हत्याकांड! माथेफिरुकडुन पती-पत्नीची हत्या, रक्ताने माखलेला टिकाव घेऊन फिरत होता रस्त्यावर https://www.navarashtra.com/latest-news/married-couple-killed-by-unknown-accused-in-pune-nrps-369171.html”]
दरम्यान, असे सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपातील मृतांची संख्या शनिवारी 25,000 पार झाली आहे, तुर्कीच्या राष्ट्रपती रेसेप तय्यप एर्दोगन यांच्या म्हणण्यानुसार, तुर्कीमध्ये मृतांची संख्या 21,848 झाली आहे. तसेच भूकंपात 80,104 लोक जखमी झाले असल्याचही त्यांनी सांगितलं. पुढे बोलताना ते म्हणाले की, देशात आम्ही आणीबाणीची स्थिती जाहीर केली आहे.” एर्दोगन म्हणाले की, याचा अर्थ आतापासून दरोडे किंवा अपहरणात सामील असलेल्यांना हे समजले पाहिजे की देशाच्या कायद्याचा मजबूत हात त्यांच्या पाठीशी आहे. सीरियाच्या सरकारी माध्यमांनुसार, सीरियाच्या सरकार-नियंत्रित भागात 1,387 लोकांचा मृत्यू झाला आहे. सीरियातील सर्व प्रभावित भागात एकूण जखमींची संख्या 5,273 आहे, ज्यात 2,326 सरकार-नियंत्रित भागात आणि 2,950 बंडखोरांच्या ताब्यातील भागात आहेत, CNN ने अहवाल दिला.