ट्रम्प, एलॉन मस्क यांच्यासह अनेक अरब नेत्यांना दिली जीवे मारण्याची धमकी; ३० मिनिटांचा व्हिडिओ जारी
येमनमधील कुख्यात दहशतवादी संघटना अलकायदा इन द अरबीयन पेनिनसुला (AQAP) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. संघटनेचा नवीन प्रमुख साद बीन अतीफ अल-अवलाक़ी याने एक धक्कादायक व्हिडिओ जारी करत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, टेस्ला आणि स्पेसएक्सचे मालक एलॉन मस्क, तसेच अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस, परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ आणि संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांना थेट जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
नेतन्याहूंना ‘मोठा धक्का’ देण्याच्या तयारीत इराण? इराणच्या गुप्तचर मंत्र्यांनी केला खळबळजनक दावा
हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे. AQAP समर्थक सोशल मीडियावर हा व्हिडिओ सक्रियपणे शेअर करत आहेत. या व्हिडिओमध्ये गाझा पट्टीतील इजरायल-हमास संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिमांविरोधातील तथाकथित अन्यायाचा बदला घेण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.
सुमारे ३० मिनिटांचा व्हिडिओ असून त्यामध्ये साद अल-अवलाक़ीने अमेरिकेच्या प्रमुख नेत्यांवर आणि अरब देशांच्या नेतृत्वावर जोरदार टीका केली आहे. त्याने म्हटले आहे की, “गाझात जे काही घडलं आणि घडत आहे, त्यानंतर आता कोणतीही रेड लाईन उरलेली नाही. बदला घेणे हाच पर्याय आहे.”
या धमकीचा आधार घेत त्याने अमेरिकन नेत्यांची आणि एलॉन मस्कच्या कंपन्यांची प्रतिमा व्हिडिओत दाखवली आहे. विशेष म्हणजे टेस्ला व स्पेसएक्स या कंपन्यांचे लोगो सुद्धा या व्हिडिओत आहेत, ज्याचा अर्थ मस्क आणि त्यांचे आर्थिक व तांत्रिक नेटवर्क देखील AQAP च्या टार्गेटवर आहेत.
यावर अमेरिकेने ६ मिलियन डॉलरचे बक्षीस जाहीर केले आहे
2024 मध्ये मारले गेलेले माजी प्रमुख खालिद अल-बतर्फी याच्या जागी नेमणूक झाली
अल-अवलाक़ी यापूर्वीही अमेरिका व त्यांना सहकार्य करणाऱ्यांवर हल्ल्यांचे आवाहन करत राहिला आहे
AQAP ला पूर्वी अलकायदाची सर्वात घातक शाखा मानली जात होते. मात्र, ड्रोन हल्ले, अंतर्गत फूट व हूती बंडखोरांशी संघर्ष यामुळे त्यांची ताकद गेल्या काही वर्षांत कमी झाली होती. सध्या या संघटनेचे सुमारे 3,000 ते 4,000 दहशतवादी व समर्थक असल्याचा अंदाज आहे. बँका लुटणे, शस्त्रांची तस्करी, खंडणी व बनावट चलन यांसारख्या मार्गांनी आर्थिक स्रोत निर्माण करत आहेत.
Russia-Ukraine War: युक्रेननंतर रशिया ‘या’ देशाला घेणार अंगावर; हल्ल्याच्या भीतीने घेतला मोठा निर्णय
गाझा युद्धामुळे अनेक दहशतवादी गटांनी पुन्हा एकदा जागतिक चर्चेत येण्याचा प्रयत्न केला आहे. ईरान समर्थित हूती बंडखोर आधीच इजरायलवर क्षेपणास्त्रे डागत आहेत. AQAP आता स्वतःला “मुस्लिमांचे रक्षक” समजत आहे. एकेकाळी हूती व AQAP यांच्यात प्रखर वैर होते, परंतु आता त्यांच्या संघर्षात काहीसा शिथिलपणा जाणवत आहे.यमनमधील घडामोडींचे अभ्यासक सांगतात की, हूती जर मुस्लिम जगतामध्ये इजरायलविरोधातील नेता म्हणून उभे राहत असतील, तर अल-अवलाक़ी त्याला पर्यायी नेता म्हणून उभे राहण्याचा प्रयत्न करत आहे.






