अमेरिका-इराण संघर्ष शिगेला (फोटो- ai gemini)
इराण व अमेरिकेत तणाव वाढला
अमेरिकेचा हल्ला युद्धाची सुरुवात असणार – इराण
डोनाल्ड ट्रम्पचा इराणला गर्भित इशारा
गेल्या काही दिवसांपासून इराणमध्ये अंतर्गत कलह सुरू आहे. त्यातच इराण विरुद्ध अमेरिका असा संघर्ष देखील आता तापला आहे. अमेरिका व इराणमध्ये संघर्ष शिगेला पोहोचला आहे. अमेरिकेने इराणला निर्वाणीचा इशारा दिला आहे. अमेरिका कोणत्याही क्षणी इराणवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. अमेरिकेच्या धमकीला इराणने देखील जशास तसे प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे जगभरात चिंता वाढली आहे.
पुढील काळात अमेरिका विरुद्ध इराण संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. इराणने देखील प्रत्युत्तर देण्यासाठी तयारी सुरू केल्याचे समोर येत आहे. त्यामुळे जगात युद्धाचा भडका उडणार की काय अशी शंका व्यक्त केली जात आहे. इराणमध्ये विद्यमान सरकारविरुद्ध तीव्र आंदोलन सुरू आहे.
इराणमध्ये सुरू असलेल्या आंदोलनामध्ये शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे हे आंदोलन अधिक तीव्र होताना दिसून येत आहे. त्यातच अमेरिकेने इराणला खुली धमकी दिली आहे. अमेरिकेच्या युद्धनौका इराणच्या दिशेने रवाना झाल्या असल्याचे अमेरिकेने सांगितले असल्याचे म्हटले जात आहे. त्याला उत्तर देण्यासाठी इराणने देखील तयारी सुरू केली आहे.
आम्ही धाडलेल्या युद्धनौकांचा वापर आमहाल करावा लागू नये असा इशारा ट्रम्प यांनी इराणला दिल्याचे म्हटले जात आहे. इराणमधील आंदोलकांची हत्या करू नका, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा अमेरिकेने इराणला दिला आहे. अमेरिकेच्या इशाऱ्यानंतर इराणने देखील युद्धाची तयारी सुरू केली आहे. अमेरिकेने केलेला कोणताही हल्ला हा युद्धाची सुरुवात समजली जाईल असा इशारा इराणने दिला आहे.






