• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Ahilyanagar Local Crime Branch Police Officer Arrested Due To Drugs Racket

Ahilyangar News: कोणाच्या घरात होते ड्रग्ज? सुजय विखे पाटील यांनी उपस्थित केला प्रश्न

अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. ही अटक ड्रग्ज रॅकेटच्या संशयातून करण्यात आली आहे. याच प्रकरणावर सुजय विखे पाटलांनी वक्तव्य केलं आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 24, 2026 | 06:17 PM
कोणाच्या घरात होते ड्रग्ज? सुजय विखे पाटील यांनी उपस्थित केला प्रश्न

कोणाच्या घरात होते ड्रग्ज? सुजय विखे पाटील यांनी उपस्थित केला प्रश्न

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्याला अटक
  • जिल्ह्यातील ड्रग्ज रॅकेटवरून श्यामसुंदर गुजरला अटक
  • डॉ. सुजय विखे पाटलांचे वक्तव्य
अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेत (एलसीबी) कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याला पुणे पोलिसांनी मंगळवारी ड्रग्ज रॅकेटच्या संशयावरून चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. शामसुंदर गुजर असे या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून तो सध्या अहिल्यानगर एलसीबीमध्ये कार्यरत आहे. यापूर्वी तो पारनेर पोलिस ठाण्यात नेमणुकीवर होता.

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात ड्रग्जचे मोठे रॅकेट उघडकीस आल्यानंतर या प्रकरणाचे धागेदोरे थेट पारनेर व नगरपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी या प्रकरणात गंभीर शंका उपस्थित करत अहिल्यानगरचे पोलिस अधीक्षक यांनी पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण सत्य जनतेसमोर मांडावे, अशी मागणी केली आहे.

Nagpur Crime: नागपुरात पोलीस कोठडीत आरोपीची आत्महत्या; पोलीस उपनिरीक्षकासह 3 कर्मचाऱ्यांचे निलंबन

वादग्रस्त पोलिसाची थेट एलसीबीमध्ये बदली

डॉ. विखे पाटील यांनी सांगितले की, ड्रग्ज प्रकरणात ताब्यात घेतलेला पोलिस कर्मचारी पारनेर पोलिस ठाण्यात कार्यरत असताना अवैध व्यवसायिकांशी संबंधित होता. त्या काळात त्याच्या विरोधात अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या आणि बदलीची मागणीही पोलिस अधीक्षकांकडे करण्यात आली होती. असे असतानाही संबंधित वादग्रस्त पोलिसाची थेट अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेत बदली कशी झाली, याबाबत स्पष्टीकरण देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.

एकीकडे एलसीबीमध्ये प्रामाणिक पोलिसांची नियुक्ती केल्याचा दावा प्रशासन करत असताना, वादग्रस्त पोलिस कर्मचाऱ्याला कुणाच्या शिफारसीवरून एलसीबीमध्ये घेण्यात आले, हा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

ड्रग्ज कुणाच्या घरात होते? नावे का लपवली जात आहेत?

ड्रग्ज प्रकरणात जप्त करण्यात आलेले सुमारे दहा किलो ड्रग्ज पारनेरमधील दोन व्यक्तींच्या घरात साठवून ठेवण्यात आले होते. मात्र, त्या घरमालकांची नावे अद्याप समोर का आणली जात नाहीत? संबंधित व्यक्ती कुणाचे कार्यकर्ते होते? त्यांची नावे गुन्ह्यात येऊ नयेत यासाठी पोलिस ठाण्यात कोण दबाव टाकत होते? असे अनेक प्रश्न उपस्थित करत डॉ. विखे पाटील यांनी पोलिसांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन याची उत्तरे द्यावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

जेजुरी स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा द्या; प्रवासी संघटना अन् लोकप्रतिनिधी आक्रमक

आठ दिवसांत नावे जाहीर करण्याचा इशारा

या प्रकरणात पोलिसांवर कोणाचा दबाव आहे, हे त्यांनी स्पष्ट करावे. अन्यथा पुढील आठ दिवसांत आपण स्वतः पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणातील सर्व संबंधितांची नावे जाहीर करू, असा इशाराही डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिला. ड्रग्जसारख्या गंभीर गुन्ह्यात कुणीही सहभागी असेल, तो कुणाचाही कार्यकर्ता असो, त्याला कायद्याप्रमाणे शिक्षा झालीच पाहिजे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

पारनेरमधील राड्यावर प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पारनेरमध्ये झालेल्या राड्याबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्या घटनेत एका गर्भवती महिलेला मारहाण झाल्याचे वृत्त असून, लोकप्रतिनिधींच्या कुटुंबातील व्यक्तीकडून असे कृत्य होणे गंभीर असल्याचे त्यांनी म्हटले. या प्रकरणात आपला न्यायालयावर पूर्ण विश्वास असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

खासदार निलेश लंके यांच्याकडे अंगुलीनिर्देश?

डॉ. विखे पाटील यांनी थेट कोणाचेही नाव घेतले नसले, तरी “पारनेर येथील कार्यकर्ते” असा उल्लेख केल्यामुळे या प्रकरणात खासदार निलेश लंके यांच्याकडे अंगुलीनिर्देश केला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ड्रग्ज ज्या घरात साठवले होते, ते कार्यकर्ते खासदार लंके यांचेच होते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: Ahilyanagar local crime branch police officer arrested due to drugs racket

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2026 | 06:17 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Drugs Case
  • Nilesh Lanke
  • Sujay Vikhe-Patil

संबंधित बातम्या

“ओढे, बंधारे, तलाव…”, आशुतोष काळे यांच्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना ‘या’ महत्वाच्या सूचना
1

“ओढे, बंधारे, तलाव…”, आशुतोष काळे यांच्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना ‘या’ महत्वाच्या सूचना

Ahilyanagar News: जामखेडमध्ये राष्ट्रवादीचे बेमुदत उपोषण! निकृष्ट व नियमबाह्य प्रकल्पाला विरोध
2

Ahilyanagar News: जामखेडमध्ये राष्ट्रवादीचे बेमुदत उपोषण! निकृष्ट व नियमबाह्य प्रकल्पाला विरोध

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त
3

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Ahilyanagar News: कृषी महोत्सवाला शेतकरी आणि ग्राहकांचा उदंड प्रतिसाद! 5 दिवसात झाली साडेतीन कोटींची उलाढाल
4

Ahilyanagar News: कृषी महोत्सवाला शेतकरी आणि ग्राहकांचा उदंड प्रतिसाद! 5 दिवसात झाली साडेतीन कोटींची उलाढाल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
भारतीय संरक्षण दलाची ताकद वाढणार! ११४ राफेल जेट आणि ६ पी-८आय विमाने खरेदीला DAC कडून मान्यता; शत्रूचा होणार विनाश

भारतीय संरक्षण दलाची ताकद वाढणार! ११४ राफेल जेट आणि ६ पी-८आय विमाने खरेदीला DAC कडून मान्यता; शत्रूचा होणार विनाश

Feb 12, 2026 | 06:17 PM
Kolhapur : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका; जनावरांच्या दहशतीमुळे नागरिकांचं जगणं मुश्कील

Kolhapur : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका; जनावरांच्या दहशतीमुळे नागरिकांचं जगणं मुश्कील

Feb 12, 2026 | 06:10 PM
भूमि पेडणेकरने 300 कोटींच्या बजेटच्या चित्रपटाला का दिला नकार? अभिनेत्रीने स्वतःच सांगितलं खरं कारण

भूमि पेडणेकरने 300 कोटींच्या बजेटच्या चित्रपटाला का दिला नकार? अभिनेत्रीने स्वतःच सांगितलं खरं कारण

Feb 12, 2026 | 06:10 PM
“भारतात परत येईपर्यंत याचिकेवर सुनावणी होणार नाही…”, मुंबई उच्च न्यायालयाने फरार उद्योगपती विजय मल्ल्याला फटकारले

“भारतात परत येईपर्यंत याचिकेवर सुनावणी होणार नाही…”, मुंबई उच्च न्यायालयाने फरार उद्योगपती विजय मल्ल्याला फटकारले

Feb 12, 2026 | 06:07 PM
मावळच्या प्रलंबित विकासकामांवर लक्ष द्यावे; जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत MLA सुनील शेळकेंची ठोस भूमिका

मावळच्या प्रलंबित विकासकामांवर लक्ष द्यावे; जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत MLA सुनील शेळकेंची ठोस भूमिका

Feb 12, 2026 | 06:05 PM
Bhago Mobility आणि Honda ची भागीदारी! पुढील 3 वर्षात देशभर इलेक्ट्रिक दुचाकी तैनात करण्याची योजना

Bhago Mobility आणि Honda ची भागीदारी! पुढील 3 वर्षात देशभर इलेक्ट्रिक दुचाकी तैनात करण्याची योजना

Feb 12, 2026 | 06:01 PM
NEP vs ITA, T20 World Cup 2026 : वानखेडेवर इटलीच ठरली बॉस! अँथनी-जस्टिन जोडीच्या खेळीने नेपाळचा 10 विकेट्सने पराभव 

NEP vs ITA, T20 World Cup 2026 : वानखेडेवर इटलीच ठरली बॉस! अँथनी-जस्टिन जोडीच्या खेळीने नेपाळचा 10 विकेट्सने पराभव 

Feb 12, 2026 | 05:59 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Feb 12, 2026 | 02:54 PM
Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Feb 12, 2026 | 02:51 PM
Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Feb 11, 2026 | 07:56 PM
Latur :  जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Latur : जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Feb 11, 2026 | 07:19 PM
Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Feb 11, 2026 | 07:06 PM
Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Feb 11, 2026 | 05:42 PM
Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Feb 11, 2026 | 05:34 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.