ना रशिया, ना चीन... अमेरिकेच्या निशाण्यावर मित्रराष्ट्र; पेंटागॉनच्या सुरक्षा रणनीतीत मोठा बदल, जगाची उडाली झोप
अमेरिकेने (America) तयार केलेल्या या नव्या ३२ पानांच्या दस्ताऐवजातूवन, आपल्या सहयोगी देशांनावर तीव्र टीका करण्यात आली आहे. तसेत या मित्र देशांना स्वत:च्या देशाच्या सुरक्षेची जबाबादारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यातून अमेरिका आपल्या सहयोगी देशांवर नाराज असल्याचे स्पष्ट होत आहे.
यामुळे आता युरोप ते आशियापर्यंतच्या सर्व देशांनी रशियापासून ते उत्तर कोरियापर्यंतच्या सर्व शत्रू राष्ट्रांपासून संरक्षणाचा खर्च मित्र राष्ट्रांनी स्वत: उचलावा असे पेटांगॉनने म्हटले आहे. या दस्ताऐवजात नमूद करण्यात आले आहे की, अमेरिकेने गेल्या अनेक काळापासून त्यांच्या हितसंबंधाना प्राधान्य देण्याकडे दुर्लक्ष केले, पण आता मात्र ट्रम्प प्रशासन याकडे दुर्लक्ष करणार नाही.
पेंटागॉनने आपल्या नव्या धोरणात चीनविरोधातील भूमिकेत थोडा बदल केला आहे, परंतु चीनला विरोध कायम आहे. यापूर्वी चीनला अमेरिकेसाठी एक धोरणात्मक आव्हान मानले जायचे, परंतु आता पश्चिम गोलार्धात केवळ अमेरिकन हितसंबंधांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच अमेरिकेच्या सरकारने ग्रीनलँड आणि पनामा कालवा या भौगोलिक भागांकडे लक्ष्य केंद्रित करण्याचे निश्चित केले आहे. यासाठी या भागांमध्ये अमेरिकेची लष्करी आणि व्यापारी उपस्थिती मजबूत करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. गरज पडल्यास शेजारी देशांनी विरोध केला तर त्यांच्याविरोधातही कारवाई केली जाणार आहे.
पेंटागॉनने स्पष्ट केले आहे की, रशियामुळे नाटोच्या पूर्वेकडील सदस्यांसाठी धोका आहे, परंतु असे असले तरी युरोपियन देशांनी स्वत:ची संरक्षण क्षमता मजबूत करण्यास सांगण्यात आले आहे. नाटोमध्ये अमेरिकेची भूमिका कायम राहिल,
मात्र युरोपमधील उपस्थिती कमी केली जाणार असल्याचे या नव्या धोरणात सांगण्यात आले आहे.
युक्रेन लगतच्या सीमांवर अमेरिकन सैन्य मागे घेण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. यामुळे युक्रेनला मोठा धोका निर्माण झाला आहे, दुसरीकडे आशियात दक्षिण कोरियाकडे उत्तर कोरियाला रोखण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, तर तैवानच्या सुरक्षेबाबतही ठोस हमी देण्यात आलेली नाहीत. या सर्वातून अमेरिका फर्स्ट धोरणावर ट्रम्प प्रशासासन कडक भूमिका घेत अशल्याचे स्पष्ट होत आहे.
Ans: अमेरिकेच्या पेंटागॉनने सुरक्षा रणनीतीत अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाची नवी रुपरेषा आखण्यात आली आहे, विशेष करुन अमेरिका फर्स्ट धोरणाला प्राधान्य देण्यात आले आहे.
Ans: अमेरिकेने सहयोगी देशांबाबत कडक भूमिका घेत, सर्व मित्र राष्ट्रांना स्वत:च्या सुरक्षेची जबाबादारी घेण्याचा सल्ला दिला आहे.
Ans: अमेरिका नाटोचा सदस्य कायम राहिल, परंतु युरोपीय देशांना स्वत:ची संरक्षण क्षमता मजबूत असल्याने त्याची जबाबदारी घेण्यास पेंटागॉनने सांगितले आहे.
Ans: उत्तर कोरियाला रोखण्याची जबाबदारी दक्षिण कोरियावर सोपवण्यात आली आहे. तसेच तैवानच्या सुरक्षेबाबत कोणतीही हमी अमेरिकेने दिलेली नाही.






