 
        
        माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे विधान चर्चेत (फोटो- istockphoto)
बांग्लादेशमध्ये सध्या युनूस सरकार 
माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे विधान 
शेख हसीना यांच्या जीवाला होता धोका 
Bangladesh Crisis: बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे एक विधान चर्चेत आले आहे. त्यांनी बांगलादेशमधील युनूस सरकारवर टीका केली आहे. मागच्या वर्षी बांगलादेशमध्ये सत्तापालट झाला. शेख हसीना यांना आपल्या पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावे लागले. 5 ऑगस्टरोजी बांगलादेशमध्ये निदर्शने सुरू होती. माझे तिथे थांबणे योग्य नव्हते असे विधान शेख हसीना यांनी केले आहे.
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांचे खंडन केले आहे. गेल्या वर्षी बांगलादेशमध्ये जी निदर्शने झाली त्यावेळेस मी तिथे असताना माझ्या आणि माझ्या जवळच्या लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. मी गेल्या वर्षी सुरक्षा दलांना आंदोलकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले होते असे म्हणणे चुकीचे होते, असे शेख हसीना म्हणाल्या.
पुढे बोलताना शेख हसीना म्हणाल्या, ‘तिथे सुरू असलेल्या आंदोलनात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला. याची चौकशी सरकारने सुरू केली. मात्र नंतर युनूस सरकारने बंद केली. बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने (ICT) मला मृत्यूदंडाची शिक्षा दिली तरी मला आश्चर्य वाटणार नाही किंवा भीती देखील वाटणार नाही. ICT ही तेथील सरकारने म्हणजेच माझ्या राजकीय विरोधकांनी तयार केलेले कोर्ट आहे.
मोहम्मद युनूस यांचे भारतावर गंभीर आरोप
बांगलादेशचे अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस (Muhammd Yunus) यांनी भारताबद्दल वादग्रस्त व्यक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे भारत आणि बांगलादेश संबंध पुन्हा ताणले जाण्याची शक्यता आहे. न्यूयॉर्कमध्ये एका मुलाखतीदरम्यान युनूस यांनी भारतावर टीका करत म्हटले की, ऑगस्ट २०२४ मध्ये बांगलादेशात झालेल्या विद्यार्था आंदोलनाला भारताने विरोध केला, यामुळे माजी पंतप्रधान शेख हसीना (Shaikh Hasina) यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला.
‘ते आम्हाला तालिबानसारखे दाखवत आहेत’ ; मोहम्मद युनूस यांचे भारतावर गंभीर आरोप
शिवाय युनूस यांनी भारतावर असाही आरोप केला आहे की, शेख हसीना यांना दिल्लीने देशात आश्रय दिल्यामुळेच बारत आणि बांगलादेशचे संबंध तणावपूर्ण झाले आहेत. तसेच भारतीय माध्यमांवरही युनूस यांनी आरोप केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, भारतीय माध्यमांनी बांगलादेशातील विद्यार्थी आंदोलाना इस्लामिक कट्टरवादाशी जोडून खोटे चित्र जगासमोर उभे केले आहे. त्यांना आम्हाला तालिबानसारखे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या व्यक्तव्याने मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे भारतविरोधी द्वेष पसरवला जात असल्याचे दिसून येते आहे.






