Bangladesh India News: बांगलादेशातील जमात-ए-इस्लामीच्या अमीरने भारताला इच्छित दिलासा दिला, संबंधांवर मोठी घोषणा केली ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Jamaat-e-Islami Bangladesh India relations 2026 : शेख हसीना (Sheikh Hasina) यांच्या सत्तांतरानंतर भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंधांमध्ये आलेली कटुता आता एका नव्या वळणावर आहे. बांगलादेशातील सर्वात जुना आणि पाकिस्तान समर्थक मानला जाणारा कट्टरपंथी पक्ष ‘जमात-ए-इस्लामी’ (Jamaat-e-Islami) आता आपली प्रतिमा बदलण्याच्या प्रयत्नात आहे. आगामी १२ फेब्रुवारी २०२६ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, जमातचे अमीर शफीकुर रहमान यांनी भारताबाबत एक मोठे विधान केले आहे, ज्यामुळे दक्षिण आशियातील राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.
एका आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शफीकुर रहमान यांनी म्हटले की, “आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे; आम्ही आमच्या शेजाऱ्यांचे (भारत) कोणतेही नुकसान करणार नाही. आम्हाला त्यांच्याकडून केवळ परस्पर आदर आणि विश्वासाची अपेक्षा आहे.” भारताने शेख हसीना यांना सोपवण्यास नकार दिला तरी, आम्ही टोकाची भूमिका न घेता भारताशी ‘अर्थपूर्ण संवाद’ साधू, असेही त्यांनी स्पष्ट केले. या विधानाकडे भारताला दिलेला एक सकारात्मक संकेत म्हणून पाहिले जात आहे, कारण जमात-ए-इस्लामीला ऐतिहासिकदृष्ट्या भारतविरोधी मानले जाते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Niger Attack : विमानांचे पंख छिन्नविच्छिन्न! नायजरच्या राजधानीत हवाई दलाच्या तळावरील दहशतवादी हल्ल्याचा भयानक VIRAL VIDEO
जमात-ए-इस्लामीने आपल्या कट्टरपंथी प्रतिमेला छेद देण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. ‘खुलना-१’ या हिंदू बहुसंख्य मतदारसंघातून त्यांनी ‘कृष्ण नंदी’ (Krishna Nandi) यांना आपला अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले आहे. नंदी हे स्थानिक हिंदू समितीचे अध्यक्ष आहेत. जमातच्या या निर्णयामुळे राजकीय विश्लेषक थक्क झाले आहेत. “बांगलादेश हा केवळ मुस्लिमांचा नाही, तर हा एकतेचा फुलांचा बाग आहे,” असे म्हणत रहमान यांनी हिंदूंना आपल्या पक्षाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.
Very Important information :MUST #REPOST
Dear Indian Muslims listen this carefully what Sr Adv Yusuf Abrahani Saab is saying. Manoj Jadhav appointed as Executive officer from Maharashtra State Haj Committee. 😡
How any Non-Muslim understand our requirements and religious needs?… pic.twitter.com/k82MwEDOhD — Adv Rukhsana Sayed (@Umm_e_meeran1) January 14, 2026
credit – social media and Twitter
मुलाखती दरम्यान १९७१ च्या युद्धातील जमातच्या भूमिकेवरही प्रश्न विचारण्यात आले. त्यावर उत्तर देताना रहमान म्हणाले की, “त्यावेळी घेतलेला निर्णय हा लष्करी नव्हता तर राजकीय होता. भारताच्या मदतीने पाकिस्तानपासून वेगळे होणे म्हणजे बांगलादेशवर भारतीय वर्चस्व प्रस्थापित होणे होय, अशी भीती आमच्या नेत्यांना वाटत होती.” मात्र, आता काळ बदलला असून, भारताशी समतोल संबंध राखणे ही बांगलादेशची गरज असल्याचे त्यांनी मान्य केले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India-EU FTA: भारताच्या एका सहीने होणार पाकिस्तान कंगाल? 1 कोटी लोकांच्या नोकऱ्या धोक्यात; ‘या’ महाकरारामुळे इस्लामाबादमध्ये खळबळ
दुसरीकडे, भारत सरकार या घडामोडींकडे अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने वारंवार बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला आहे. जरी जमात-ए-इस्लामी मवाळ भूमिका घेत असल्याचे भासवत असले, तरी प्रत्यक्षात सत्तेत आल्यावर त्यांचे धोरण काय असेल, याबद्दल नवी दिल्लीमध्ये साशंकता आहे. विशेषतः शेख हसीना यांच्यावर चालू असलेल्या खटल्यांमुळे आणि त्यांच्या प्रत्यर्पणाच्या मागणीमुळे दोन्ही देशांतील तणाव कायम आहे.
Ans: जमातने 'खुलना-१' मतदारसंघातून कृष्ण नंदी यांना उमेदवारी दिली आहे, जे स्थानिक हिंदू समितीचे अध्यक्ष आहेत.
Ans: त्यांनी म्हटले की, त्यांचा पक्ष सत्तेत आल्यास भारताच्या सुरक्षेला धोका पोहोचणार नाही आणि संबंध परस्पर आदरावर आधारित असतील.
Ans: बांगलादेशात सार्वत्रिक निवडणुका १२ फेब्रुवारी २०२६ रोजी नियोजित आहेत.






